भारतात करोनारुग्णांची संख्या ३० लाखांच्या पुढे, भारत जगात तिसऱ्यास्थानी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, August 23, 2020

भारतात करोनारुग्णांची संख्या ३० लाखांच्या पुढे, भारत जगात तिसऱ्यास्थानी

https://ift.tt/2QhOHUu
नवी दिल्ली: भारतात करोनाची () लागण झालेल्या रुग्णांची संख्या आता ३० लाखांच्या पुढे गेली आहे. १६ दिवसांपूर्वीच ही संख्या २० लाखांच्या पुढे गेली होती. इतकेच नाही, तर शनिवारी तर दिवसभरातील सर्वाधिक रुग्णांची नोंद करण्यात आली. शनिवारी एकूण ७० हजार ४८८ नव्या रुग्णांची भर पडली. तर देशात एकूण ५६ हजार ८४६ रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. देशात रुग्णांच्या संख्येने दुसऱ्यांदा ७० हजारांचा आकडा पार केला आहे. या पूर्वी बुधवारी ७० हजार १०१ नवे रुग्ण आढळले होते. ( in india crossed the 30 lakh mark) तर, दुसरीकडे करोनावर मात करत बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या २२ लाख ७१ हजारांहून अधिक झाली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी सकाळी ८ वाजेपर्यंत प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार, शनिवारी देशात करोनाचे ६९ हजार ८७४ रुग्ण आढळले होते. यामुळे देशात करोनाची लागण झालेल्या एकूण रुग्णांची संख्या वाढून ती २९,७५,७०१ वर पोहोचली. गेल्या २४ तासांमध्ये ९४५ रुग्णांच्या मृत्यूसह देशात करोनामुळे मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची संख्या ५५ हजार ७९४ इतकी झाली आहे. शनिवारी रात्रीपर्यंत राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांकडून मिळालेल्या माहितीनुसार, देशात एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या ३० लाख ४० हजार ५९७ वर पोहोचली आहे. तर मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या ५६ हजार ७६४ इतकी आहे. तसेच करोनावर मात करणाऱ्यांची संख्या २२ लाख ७१ हजार ५४ इतकी झाली आहे. भारता हा करोना संसर्गामध्ये अमेरिका आणि ब्राझीलनंतर जगातील तिसरा देश बनला आहे. या आजारावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या २२ लाख २२ हजार ५७७ इतकी झाली असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने शनिवारी म्हटले. तर रुग्ण बरे होण्याचा दर ७४.६९ टक्के इतका झाला आहे. तर मृत्युदरात घट होऊन तो १.८७ टक्क्यांवर आला आहे. बरे होणाऱ्या लोकांची संख्या सक्रिय रुग्णांपेक्षा १५ लाखांनी अधिक आहे. वाचा ही बातमी: भारताने गेल्या २४ तासांमध्ये १० लाखांहून अधिक नमुन्यांची चाचणी केली. तर देशात आतापर्यंत एकूण ३ कोटी ४४ लाख ७३ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. आयसीएमआरने शुक्रवारी १० लाख २३ हजार ८३६ नमुन्यांच्या चाचणीसह २१ ऑगस्टपर्यंत ३ कोटी ४४ लाख ९१ हजार ७३ नमुन्यांची चाचणी केली. वाचा ही बातमी: वाचा हे