मुंबई- संजय दत्त, , आदित्य रॉय कपूर, पूजा भट्ट स्टारर ‘सडक 2’ सिनेमा २८ ऑगस्ट रोजी डिजिटल प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित झाला. पण ट्रेलर आणि सिनेमांच्या गाण्याप्रमाणे संपूर्ण सिनेमालाही नकारात्मक प्रतिसाद मिळाला. २१ वर्षानंतर दिग्दर्शनात कमबॅक करणाऱ्या महेश भट्ट यांच्या या सिनेमावर सोशल मीडियावर अनेकांनी आपल्या प्रतिक्रिया दिल्या. यानंतर #ThrilledBySadak2 हा ट्रेण्डही सोशल मीडियावर सुरू झाला. सिनेमाला आयएमडीबी रेटिंगमध्ये १० पैकी चक्क १.२ स्टार मिळाले आहेत. '' सूडाची एक कथा दरम्यान, 'सडक २' ही सुडाची एक कथा आहे. यात आलिया भट्टची व्यक्तिरेखा मकरंद देशपांडेच्या व्यक्तिरेखेशी सूड घेताना दिसत आहे. सिनेमात टॅक्सी चालकाच्या भूमिकेत आहे तर आदित्य रॉय कपूर आलियाच्या प्रियकराच्या भूमिकेत आहे. ट्रेलरला केले गेले नापसंत ज्यावेळी सेडक २ सिनेमाचा ट्रेलर आला तेव्हा या ट्रेलरला सर्वाधिक नापसंत केला गेलेला ट्रेलर करण्यात आलं. अनेकांनी ट्रेलरला डिसलाइक केलं. एवढंच नाही तर जगातील सर्वाधिक नापसंत करण्यात आलेल्या ट्रेलरमध्ये सडक २ चा तिसरा नंबर लागतो. जवळपास १० दशलक्ष लोकांनी या ट्रेलरला डिसलाइक केलं होतं.
https://ift.tt/3lwX0du