
बारामती: मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं दिलेल्या स्थगितीनंतर मराठा समाज आक्रमक झाला असून मराठा संघटनांनी राज्य सरकारकडं वेगवेगळ्या मागण्या केल्या आहेत. या मागण्यांच्या पूर्ततेसाठी संघटना रस्त्यावर उतरल्या आहेत. राज्य सरकारमधील मंत्र्यांच्या घरासमोर 'ढोल बजाव' आंदोलन सुरू करण्यात आलं आहे. सकल मराठा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आज उपमुख्यमंत्री यांच्या बारामतीतील घरासमोर ढोल वाजवून आंदोलन केलं. वाचा: बारामतीतील सहयोग सोसायटी येथील निवासस्थानासमोर हे आंदोलन करण्यात आलं. आंदोलनाच्या वेळी उपमुख्यमंत्री अजित पवार हे घरी उपस्थित नव्हते. वाचा: