भिवंडीत ५३ तासांनंतरही बचावकार्य सुरू, अद्याप १० जणांचा शोध बाकी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, September 23, 2020

भिवंडीत ५३ तासांनंतरही बचावकार्य सुरू, अद्याप १० जणांचा शोध बाकी

https://ift.tt/3ky6vrA
ठाणे: भिवंडीतील पटेल कंपाउंड येथील जिलानी ही तीन मजली इमारत कोसळून झालेल्या दुर्घटनेत मृतांचा आकडा ३५ वर गेला असून ५३ तासानंतरही बचावकार्य सुरू आहे. अद्याप ढिगाऱ्याखाली अडकलेल्या १० जणांचा शोध लागलेला नाही. त्यामुळे बचावकार्य आज संध्याकाळ संपण्याची शक्यता अधिकाऱ्यानी व्यक्त केली आहे. सोमवारी पहाटे या इमारतीचा एक भाग कोसळला होता. मृतांमध्ये दहा वर्षाखालील मुलामुलींची संख्या १२ आहे. तर या दुर्घटनेत १९ पुरुष आणि १६ स्त्रियांचा मृत्यू झाला आहे. २५ जणांची सुखरुप सुटका करण्यात आली आहे. वस्त्रोद्योग मंत्री अस्लम शेख आज दुपारी दुर्घटनाग्रस्त इमारतीची पाहणी करणार आहेत. तसेच स्थानिक रहिवाशी आणि अधिकाऱ्याशी चर्चा करणार आहेत.