नवजात बालकाला तीन पाय, पाहण्यासाठी लोकांची उडाली झुंबड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, October 5, 2020

नवजात बालकाला तीन पाय, पाहण्यासाठी लोकांची उडाली झुंबड

https://ift.tt/3jzP2yP
गाजीपूर: उत्तर प्रदेशातील जिल्ह्यात एका मुलाच्या जन्मानंतर त्याला पाहण्यासाठी मोठी गर्दी उसळली आहे. ही घटना तियरा या गावात घडली आहे. येथे तीन पाय असलेले मूल जन्माला आले आहे. हा एखादा दैवी चमत्कार असल्याचा काही लोकांचा समज झाला आहे. असे लोक या मुलापुढे अनेक गोष्टी अर्पण करू लागले आहेत. अशा प्रकारचे मूल जन्माला आल्याचे समजताच दूरदूरहून लोक मुलाला पाहण्यासाठी येत आहेत. तियरा गावात राहणाऱ्या प्रियंका देवी या २९ सप्टेंबर या दिवशी बद्दोपूरच्या पीएचसी येथे प्रसूत झाल्या. त्यांची प्रसूती सामान्य झाल्यामुळे कुटुंबात सर्वानांच आनंद झाला. प्रसूतीनंतर सुईण बाहेर आल्यानंतर तिने मुलाला तीन पाय असल्याचे सांगितले. मुलाचा तिसरा पाय त्याच्या गुप्तांगाशी जोडला गेलेला आहे. या पायाला सहा बोटे आहेत. हे ऐकून कुटुंबातील सर्वांना धक्काच बसला. त्यानंतरही हे नवजात बालक सामान्यपणे दूध पीत होते. 'हा काही दैवी अवतार नाही' या मुलाचा जन्म म्हणजे दैवी अवतार किंवा चमत्कार असल्याचे मानून लोक या मुलाला पाहण्यासाठी गर्दी करू लागले आहेत मुलाचे वडील विवेकानंद हे गरीब आहेत. या मुलावर उपचार करण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत. आपल्या मुलाच्या उपचारासाठी लोकांनी आपल्याला मदत करावी, असे त्यांचे म्हणणे आहे. या बरोबरच त्यांनी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना देखील मदतीचे आवाहन केले आहे. क्लिक करा आणि वाचा- हा विशिष्ट प्रकारचा आजार असून या आजाराला कंजेनिटल अनोमिली असे म्हणतात. यात रुग्णाच्या तपासणीनंतरच त्याच्यावर उपचार होतील आणि त्यानंतरच रुग्ण बरा झाला हे सांगता येते असे सहाय्यक मुख्य वैद्यकीय अधिकारी उमेश कुमार यांनी सांगितले. गरोदर महिला जर रेडिएशनच्या संपर्कात आली किंवा एखाद्या औषधाचा साइड इफेक्ट झाल्यास अशा प्रकारचे मूल जन्माला येते. ही कोणती दैवी घटना नाही, असे उमेश कुमार म्हणाले. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-