
वॉशिंग्टन: अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना करोनाची बाधा झाली असल्याचे समोर आल्यानंतर खळबळ उडाली होती. सध्या ट्रम्प यांच्यावर लष्कराच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ट्रम्प यांचे वय पाहता आता डॉक्टरांनी त्यांना करोनावर नवीन औषध देणे सुरू केले आहे. हे औषध सामान्य लोकांसाठी उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. या औषधाचा सकारात्मक परिणाम होत असल्याचेही समजते. ट्रम्प यांना नवे अॅण्टीबॉडीचे औषध डेली मेलने दिलेल्या वृत्तानुसार, करोनावरील या प्रायोगिक औषधाचे नाव REGN-COV2 (पॉलिक्लोनल अॅण्टीबॉडी) आहेत. रेजेनरॉन या औषध कंपनीने हे औषध विकसित केले आहे. REGN-COV2 हे काही औषधांच्या मिश्रणातून विकसित करण्यात आले आहे. तर, ब्रिटनमध्येही या औषधाचा वापर रिकव्हरी ट्रायलसाठी करण्यात येत आहे. हे औषध अतिशय गुणकारी असल्याचे ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या एका प्राध्यापकाने सांगितले आहे. वाचा: वाचा: ट्रम्प यांच्या डॉक्टराने दिला दुजोरा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे डॉक्टर शॉन कॉनली यांनी सांगितले की, त्यांच्या उपचारासाठी रेजेनरॉनच्या पॉलिक्लोनल अॅण्टीबॉडी कॉकटेलच्या ८ ग्रॅमच्या औषधाचा डोस देण्यात आला आहे. ट्रम्प यांच्यात आजाराची सौम्य लक्षणे दिसत असून लवकरच ते बरे होतील असा विश्वास व्हाइट हाऊसच्या एका अधिकाऱ्याने व्यक्त केला. वाचा: डॉक्टरांकडून 'या' औषधांचा वापर करोना संसर्गाला अटकाव करणारे REGN-COV2 या औषधासह डोनाल्ड ट्रम्प यांना रेमेडिसिवर, झिंक, व्हिटॅमिन डी, फॅमोटिडाइन, मेलाटोनिन आणि एस्पिरीन आदी औषधेदेखील दिली जात आहेत. त्यामुळे त्यांच्या प्रकृतीत अधिक लवकर सुधारणा होण्याची अपेक्षा आहे. काही औषधांचे मिश्रण असलेले औषध अधिक प्रभावी ठरेल असा दावाही काही तज्ञांनी व्यक्त केला आहे. वाचा: कंपनीचा दावा हे औषध तयार करणारी कंपनी 'रेजेनरॉन'ने सांगितले की, चाचणी दरम्यान या औषधामुळे शरीरातील करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर कमी झाला असल्याचे समोर आले आहे. चाचणी दरम्यान मिळालेला डेटाही त्याकडे निर्देश करत असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जून महिन्यात या औषधाची चाचणी करण्यात आली होती. प्राथमिकदृष्ट्या हे औषध सुरक्षित असल्याचे समोर आले.