काबूल: दोन लष्करी हेलिकॉप्टरची भीषण धडक; ९ जवान ठार - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, October 14, 2020

काबूल: दोन लष्करी हेलिकॉप्टरची भीषण धडक; ९ जवान ठार

https://ift.tt/2IwT1yJ
काबूल: अफगाणिस्तानमध्ये हवाई दलाच्या दोन हेलिकॉप्टरमध्ये हवेतच धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात ९ जवान ठार झाले आहेत. हा अपघात बुधवारी पहाटे एक वाजण्याच्या सुमारास दक्षिणी हेलमंद प्रातांतील नावा जिल्ह्यात झाला. अपघातग्रस्त हेलिकॉप्टर जखमी सैनिकांना घेऊन जात होते, अशी माहिती समोर आली आहे. मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे. अफगाणिस्तानच्या टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार, नावा जिल्ह्यातील एका मोहिमेदरम्यान काही जवान जखमी झाले होते. त्यांना उपचारासाठी घेऊन येण्यासाठी आणि इतरांना मदत पाठवण्यासाठी हेलिकॉप्टर दाखल झाले होते. वाचा: वाचा: वाचा; वाचा: अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने या अपघाताबाबत काहीही भाष्य केले नाही. प्रांताच्या राज्यपालांचे प्रवक्ते उमर ज्वाक यांनी नावा जिल्ह्यात झालेल्या अपघाताची पुष्टी केली आहे. मात्र, अधिक तपशील देण्यास नकार दिला. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले. अपघातातील जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अपघाताचे नेमके कारण समोर आले नाही. हेलिकॉप्टरमधील बिघाडामुळे हा अपघात झाला असावा असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.