नवी दिल्ली : देशात करोना संक्रमणाचं प्रमाण कमी होताना दिसत असतानाच अचानक संक्रमणाचा फैलाव पुन्हा एकदा जोरदार 'यू टर्न' घेताना दिसतोय. शुक्रवारी हरियाणा आणि राजस्थानात आत्तापर्यंत दरदिवसाला दाखल होणाऱ्या रुग्णांच्या सर्वोच्च संख्येची नोंद करण्यात आलीय. करोना संक्रमणाचं वाढतं प्रमाण लक्षात घेता मध्य आणि उत्तर भारतातील अनेक राज्यांत संपूर्ण लॉकडाऊन नसलं तरी अनेक बंद्या घोषित करण्यात आल्या आहेत. नोव्हेंबर महिन्यात देशातील इतर भागांत करोना संक्रमणाची रुग्णसंख्या घटताना दिसली. मात्र याच वेळी उत्तर भारतात याच्या अगदी उलट ट्रेन्ड पाहायला मिळाला. दिल्ली, हरियाणा, हिमाचल प्रदेश, पंजाब, चंदीगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशात अॅक्टिव्ह केसेसची संख्या लक्षणीय प्रमाणात वाढल्याचं दिसतंय. महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ, पश्चिम बंगालमध्ये हे प्रमाण घटलेलं आढळून आलं. हरियाणामध्ये ३० नोव्हेंबरपर्यंत करण्यात आल्या आहेत. मध्य प्रदेशातील पाच जिल्ह्यात नाईट लॉकडाऊन राहील. गुजरातमध्ये अहमदाबाद, सूरत, वडोदरा आणि राजकोटमध्ये नाईट कर्फ्यू घोषित करण्यात आला आहे. वाचा : वाचा : राजस्थानच्या ३३ जिल्ह्यांमध्ये कलम १४४ (संचारबंदी) लागू करण्यात आलंय. महाराष्ट्र सरकारकडूनही दिल्लीला येणाऱ्या-जाणाऱ्या विमानांवर आणि रेल्वेची संख्या नियंत्रित करण्यावर विचार सुरू आहे. उत्तर प्रदेशच्या आरोग्य विभागानं शुक्रवारी कोविडच्या दुसऱ्या लाटेचा जारी केलाय. घरातून बाहेर पडणं टाळा, असा सल्ला लोकांना दिला जातोय. दरम्यान, हरियाणा, राजस्थान, गुजरात आणि मणिपूर या राज्यांतील करोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं उच्चस्तरीय केंद्रीय पथके पाठविण्यात आली आहेत. ही पथके संसर्ग रोखणे, पाहणी, तपासण्या आणि प्रभावी वैद्यकीय व्यवस्थापन यासाठी राज्य सरकारांना मदत करतील. लशीचा तिसरा चाचणी टप्पा सुरू दरम्यान, अंबालामध्ये हरियानाचे आरोग्यमंत्री अनिल वीज यांनी शुक्रवारी करोना चाचणी लस घेतली. राज्यात लशीचा तिसरा चाचणी टप्पा आता सुरू झाला आहे. भारत बायोटेकने ही लस विकसित केली आहे. भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते असलेले वीज ६७ वर्षांचे आहेत. येथील सरकारी रुग्णालयात त्यांनी ही लस घेतली. त्यांना मधुमेह असून, त्यांच्यावर एक शस्त्रक्रियाही झाली आहे. त्यांना लस घेतल्यानंतर काही काळ निरीक्षणाखाली ठेवण्यात आल्याचं शल्य चिकित्सक डॉ. कुलदीप सिंह यांनी सांगितलं. वाचा : वाचा :