केबल दुरुस्तीसाठी 'तो' डॉक्टर महिलेच्या घरी आला; किंचाळी ऐकू आली अन् - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, November 22, 2020

केबल दुरुस्तीसाठी 'तो' डॉक्टर महिलेच्या घरी आला; किंचाळी ऐकू आली अन्

https://ift.tt/39cEZ06
आग्रा: उत्तर प्रदेशातील येथील कमला नगर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी एका महिला डॉक्टरची चाकूने भोसकून हत्या करण्यात आली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली. डिश दुरुस्त करण्यासाठी घरी आलेल्या केबल ऑपरेटरवर या हत्येचा आरोप आहे. पोलिसांनी आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज तपासले आहेत. प्रेमसंबंधांतून ही हत्या झाल्याचा संशय पोलिसांना आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कमला नगर परिसरात डॉ. अजय सिंघल आपली डेंटिस्ट पत्नी डॉ. निशा (वय ३८) आणि दोन मुलांसह राहत होते. नातेवाईकांच्या माहितीनुसार, संध्याकाळी टीव्ही केबलमध्ये काही समस्या निर्माण झाल्याने त्यांनी केबल ऑपरेटर शुभमला बोलावले होते. शुभम घरी आल्यानंतर त्यांनी मुलांना खोलीत जायला सांगितले. त्याचवेळी निशा यांच्या किंचाळण्याचा आवाज ऐकायला आला. तो ऐकून मुले बाहेर आली. त्यावेळी शुभमने त्यांना चाकूचा धाक दाखवला. सूत्रांच्या माहितीनुसार, महिला डॉक्टर आणि शुभम यांच्यात फोनवर खूप बोलणे व्हायचे. पोलिसांना याचे पुरावे सापडले आहेत. महिला डॉक्टरने काही दिवसांपूर्वी आरोपी शुभम याला आर्थिक मदत केली होती. त्याला मोबाइल दुकान सुरू करून देण्यास मदत केली होती. त्यांच्या मैत्रीबद्दल शेजाऱ्यांमध्येही चर्चा सुरू होती. चाकूने वार करत होता... घरातील केबल बंद होता. दुरुस्तीसाठी शुभमला बोलावले होते. शुभम घरी आल्यानंतर दोन्ही मुले खोलीत गेले होते. आईच्या किंचाळण्याचा आवाज ऐकून दोघेही बाहेर आले. शुभम त्यांच्या आईवर चाकूने वार करत होता. त्याने दोन्ही मुलांनाही मारण्याचा प्रयत्न केला. पण प्रसंगावधान राखून मुलांनी बेशुद्ध होण्याचे नाटक केले. मात्र, दोघांचा मृत्यू झाल्याचे समजून शुभम तेथून निघून गेला. शुभम गेल्यानंतर दोन्ही मुले बाथरूममध्ये जाऊन लपून बसले. त्यांचे वडील घरी आल्यानंतर ते बाथरूममधून बाहेर निघाले आणि घडलेली घटना सांगितली.