जयपूर : राजस्थानच्या सरकारातील आणि काँग्रेसचे दलित नेते यांचं सोमवारी सायंकाळी उशिरा निधन झालं. मृत्यूसमयी ते ७२ वर्षांचे होते. मेघवाल यांनी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. ते काही महिन्यांपासून ते अनेक आजारांना धीरानं तोंड देत होते. दुर्दैव म्हणजे, १८ दिवसांपूर्वीच म्हणजे २९ ऑक्टोबर रोजी त्यांची मुलगी यांचा मृत्यू झाला होता. () आज (मंगळवारी) सकाळी १०.३० वाजता हेरिटेज मुख्यालयात श्रद्धांजली सभेचं आयोजन करण्यात आलंय. या दरम्यान महापौर, आयुक्त, उपमहापौर यांच्यासहीत अनेक नेते उपस्थित राहणार आहेत. यापूर्वी, १३ मे रोजी भंवरलाल मेघवाल यांची प्रकृती ढासळली होती. त्यांना ब्रेन हॅमरेजला सामोरं जावं लागलं. सुरुवातीला त्यांना जयपूरच्या एका रुग्णालयात दाखल करण्यात आलं. परंतु, प्रकृतीत सुधारणा न झाल्यानं त्यांना काही दिवसांनी गुरुग्रामच्या मेदांता रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. भंवरलाल यांना मेदांता रुग्णालयात हलवत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत (CM Ashok Gehlot) यांनी स्वत: विमानतळावर दाखल होत भंवरलाल यांची भेट घेतली होती. गुरुग्राममध्ये ते अनेक दिवसांपासून व्हेन्टिलेटरवर होते. सोमवारी त्यांची प्रकृती आणखीनच बिघडली आणि सायंकाळी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वाचा : वाचा : पंतप्रधानांनी शोक केला व्यक्त भंवरलाल मेघवाल यांच्या निधनावर पंतप्रधान नरेंद्र मोदी, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत सहीत अनेक दिग्गज नेत्यांनी शोक व्यक्त केला आहे. 'राजस्थानचे कॅबिनेट मंत्री मास्टर भंवरलाल मेघवाल यांच्या निधनानं दु:खी आहे. ते एक अनुभवी नेता होते, राजस्थानची सेवा करण्यासाठी ते प्रयत्नशील होते. दु:खाच्या या प्रसंगी त्यांचे कुटुंबीय आणि समर्थकांप्रती संवेदना' असं ट्विट पंतप्रधान मोदींनी केलंय. वाचा : वाचा : काँग्रेसच्या दलित नेत्याचा चेहरा हरपला भंवरलाल मेघवाल हे माजी पंतप्रधान यांच्या काळापासून काँग्रेसशी जोडले गेले होते. हळूहळू त्यांनी पक्षातील दलित नेता अशी आपली ओळख प्रस्थापित केली. सध्या भंवरलाल यांच्याकडे सामाजिक न्याय आणि आपत्ती व्यवस्थापन मंत्रालयाची जबाबदारी होती. ते एक उत्तम प्रशासक म्हणून ओळखले जात होते. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या मागच्या सत्ताकाळात त्यांनी शिक्षण मंत्री म्हणून जबाबदारी हाताळली होती. ते आत्तापर्यंत पाच वेळा आमदार म्हणून निवडून आले होते. भंवरलाल यांच्या कुटुंबाविषयी भंवरलाल यांच्या परिवारात पत्नी, एक मुलगा आणि एक मुलगी आहे. त्यांच्या पत्नी केसर देवी या पाच दिवसांपूर्वी पंचायत समिती सदस्य म्हणून निवडून आल्या आहेत. वाचा : वाचा :