जयपूर: करोनाचा उद्रेक (Corona outbreak) होण्यापूर्वी राजस्थानात आलेल्या एका ब्रिटीश नागरिकाला सुरुवातीला डेंग्यू आणि मलेरियाची ( and ) लागण झाली, त्यानंतर त्याला करोना झाला. या तीन आजारांशी लढाई जिंकल्यानंतर त्याला एका विषारी साप चावला. विशेष म्हणजे या विषावर देखील या ब्रिटीश नागरिकाने मात केली. इयान जोनस असे या ब्रिटीश नागरिकाचे नाव असून त्याला नाग चावला होता. त्यानंतर त्याला जोधपूरमधील एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. ( was bitten by a ) रुग्णालयाचे डॉक्टर अभिषेक तातर यांनी माहिती देताना सांगितले की, इयान जोनसला नागाने दंश केल्यानंतर त्याला रुग्णालयात आणले गेले. सुरुवातीच्या तपासणीतत त्याला करोना झाला असावा असा संशय आला. मात्र तपासणीनंतर त्याला करोना नसल्याचे स्पष्ट झाले. त्याच्यात सर्पाने दंश केल्याची सर्व लक्षणे दिसत होती. त्याला अंधूक दिसू लागले होते. त्याला धड चालताही येत नव्हते. त्याच्यावर उपचार सुरू केले गेले. आम्हाला वाटते की दंशाचा दीर्घकालीन परिणाम झालेला नाही. जोनसला या आठवड्याच्या सुरुवातीलाच घरी सोडण्यात आले. लवकरच तो आपल्या मायदेशी परतणार आहे. आपल्या वडिलांच्या तब्येतीविषयी बोलताना जोनसचा मुलगा सॅब याने सांगितले की, माझे वडील फायटर आहेत. भारतात राहत असताना करोनाचा संसर्ग होण्यापूर्वी त्यांना डेंग्यू आणि मलेरिया झाला होता. करोनाचा उद्रेक झाल्यामुळे त्यांना मायदेशी परतता आले नव्हते. क्लिक करा आणि वाचा बातमी- इयान जोनस हा राजस्थानातील पारंपरिक कलाकारांसोबत काम करतो. या कलाकारांचे सामान ब्रिटनला पाठवण्यात तो या कलाकारांची मदत करतो. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-