'संडे असो वा मंडे, रोज खाऊ नका अंडे'! शास्त्रज्ञांनी दिला इशारा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, November 17, 2020

'संडे असो वा मंडे, रोज खाऊ नका अंडे'! शास्त्रज्ञांनी दिला इशारा

https://ift.tt/32SbpJp
मेलबर्न: 'संडे असो वा मंडे रोज खा अंडे', असे म्हटले जाते. अनेकजण दररोजच्या आहारात अंड्यांचा समावेश करतात. मात्र, ऑस्ट्रेलियातील शास्त्रज्ञांनी दररोज अंडी न खाण्याचा इशारा दिला आहे. दररोज एक अंड खाल्ल्यामुळे मधुमेह टाइप-२ चा धोका वाढत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे. शास्त्रज्ञांनी ८५४५ चिनी युवकांवर केलेल्या संशोधनात ही बाब समोर आली आहे. अंडी खाणे आणि मधुमेहाचा संबंध असल्याचे शास्त्रज्ञांना आढळून आले. जगभरात अंड्यांचा समावेश पोषक तत्व असलेल्या पदार्थांमध्ये करण्यात येतो. आरोग्यासाठी उत्तम असल्यामुळे अनेकजण दररोज एक तरी अंडे खातात. आता हेच आरोग्यदायी अंडी मधुमेहावर संशोधन करणाऱ्यांसाठी एक कोडं झालं आहे. याआधीच्या संशोधनात दररोज अंड खाल्ल्यामुळे मधुमेह होत नसल्याचा दावा करण्यात आला होता. आता नवीन संशोधनात याउलट दावा करण्यात आला आहे. वाचा: नुकत्याच समोर आलेल्या संशोधनानुसार, दररोज एक अंड खाल्ल्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण अधिक होण्याचा धोका असतो. यामुळे अतिउच्च मधुमेह होण्याचाही धोका संभावत असल्याचे शास्त्रज्ञांनी म्हटले. दक्षिण ऑस्ट्रेलिया विद्यापीठाचे संशोधक डॉ. मिंग ली यांनी सांगितले की, मधुमेह आणि अंडी यांच्या संबंधाबाबत अनेकेवेळेस चर्चा झडल्या आहेत. एखाद्या व्यक्तीने दीर्घकाळ अंडे खाणे आणि त्याला मधुमेह होण्याच्या धोक्याबाबत आकलन करणे हा संशोधनाचा उद्देश्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दररोज एक अंडे खाल्ले तरी मधुमेह होण्याचा धोका ६० टक्क्यांनी वाढत असल्याचे संशोधनात म्हटले आहे. वाचा: वाचा: या संशोधनात चिनी नागरिकांवर लक्ष्य केंद्रीत करण्यात आले होते. या चिनी नागरिकांच्या आहारात पारंपरीक खाद्यपदार्थ आणि भाज्यांऐवजी अंडी, मांस आणि स्नॅक्स पदार्थ होते. वर्ष १९९१ पासून २०१९ दरम्यान अंडी खाणाऱ्या चिनी नागरिकांची संख्या दुप्पट झाली. वर्ष १९९१-९१ मध्ये १६ ग्रॅम अंडी खाल्ली जात होती. तर, २००-०४ मध्ये याचे प्रमाण वाढून ही संख्या २६ ग्रॅम इतकी झाली. वर्ष २००९ मध्ये हेच प्रमाण ३९ ग्रॅम इतके झाले होते. जगभरात मधुमेहाच्या आजारावर ७६० अब्ज डॉलर खर्च करण्यात येतो.