
बीजिंग: जगभरात करोना संसर्गाचे थैमान सुरू आहे. करोना संसर्गाच्या मुद्यावरून जगभरातील काही देशांनी चीनला जबाबदार ठरवले आहे. चीनच्या प्रयोगशाळेतून हा विषााणू जगभरात फैलावला असल्याचा आरोप अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला होता. मात्र, चीनकडून हा आरोप फेटाळण्यात आला आहे. याउलट चीनने भारतावरच आरोप केले आहेत. चीनमधील अॅकेडमी ऑफ सायन्सेसच्या टीमने हा दावा केला आहे. या दाव्यानुसार, वर्ष २०१९ मध्ये सर्वात पहिल्यांदा करोनाचा विषाणू भारतात उन्हाळ्यात समोर आला. वुहानमध्ये विषाणू येण्याआधीच भारतात एखाद्या प्राण्यामुळे दूषित पाण्यातून माणसांमध्ये संसर्ग फैलावला असण्याची शक्यता चीनच्या शास्त्रज्ञांनी व्यक्त केली. या संशोधनासाठी शास्त्रज्ञांनी फिलोगेनेटिक विश्लेषणाचा आधार घेतला. यामुळे विषाणूंच्या स्रोताची माहिती मिळू शकेल. या पद्धतीचा वापर केल्यानंतर विषाणूंचा मूळ स्रोत वुहान नसल्याचे समोर आले. यामध्ये भारत, अमेरिका, बांगलादेश, ग्रीस, ऑस्ट्रेलिया, इटली, चेक प्रजासत्ताक, रशिया, सर्बिया आदी देशांची नावे समोर आली. शास्त्रज्ञांनी सांगितले की, भारत आणि बांगलादेशमध्ये सर्वात कमी म्युटेशनची नोंद करण्यात आली. त्याशिवाय हे दोन्ही देश चीनच्या जवळच आहेत. त्यामुळे पहिल्यादां संसर्ग याठिकाणीच फैलावला असू शकतो. पहिल्यांदा जुलै ते ऑगस्ट २०१९ दरम्यान पहिल्यांदा आढळला असल्याचा दावा करण्यात आला. वाचा: तर, चीनच्या शास्त्रज्ञांचा हा दावा ब्रिटनमधील तज्ज्ञांनी फेटाळून लावला आहे. ग्लोसगो विद्यापीठातील तज्ज्ञ डेविड रॉबर्टसन यांनी चिनी शास्ज्ञांचा अभ्यास सदोष असल्याचे सांगितले. त्यांच्या या अभ्यासामुळे करोनाबाबत काही नवीन, ठोस माहिती समोर आली नसल्याचे त्यांनी 'डेली मेल'ला सांगितले. वाचा: वाचा: चीनने पहिल्यांदाच करोनाच्या संसर्गासाठी इतर देशाला जबाबदार धरले आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडूनही करोनाच्या निर्मितीबाबत शोध घेणे सुरू केले आहे. मागील वर्षी चीनमध्ये नोव्हेंबरमध्ये करोनाचा पहिला रुग्ण आढळला होता. मात्र, डिसेंबर महिन्याच्या अखेरीस चीनने याची माहिती दिली. जानेवारी महिन्यापासून करोनाच्या संसर्गाने थैमान सुरू केले होते. त्यांनंतर ११ महिन्या करोना जगभरातील २००हून अधिक देशांमध्ये फैलावला आहे.