हृतिकवर भडकली कंगना म्हणाली- 'छोट्याशा अफेअरसाठी किती रडशील' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 15, 2020

हृतिकवर भडकली कंगना म्हणाली- 'छोट्याशा अफेअरसाठी किती रडशील'

https://ift.tt/34cBSlR
मुंबई- पुन्हा एकदा आणि कंगना रणौतच्या अफेअरची चर्चा होताना दिसत आहे. हृतिकने कंगना विरोधाक एक एफआयआर दाखल केली होती. आता हे प्रकरण सायबर सेलकडून क्राइम ब्रान्च इन्टेलिजेन्स युनिटकडे देण्यात आलं आहे. आता या प्रकरणात पुन्हा एकदा कंगनाने तिची प्रतिक्रिया दिली आहे. हृतिकबद्दल बोलताना कंगनाने सोशल मीडियावर लिहिले की, 'एका छोट्याशा अफेअरसाठी कधीपर्यंत रडणार.' यापूर्वी मुंबईच्या सायबर सेल युनिटमार्फत या प्रकरणाचा तपास सुरू असल्याचं स्पष्ट झालं होतं. रिपोर्टनुसार, हृतिकच्या वकिलांनी मुंबई आयुक्तांना पत्र लिहून या प्रकरणाची योग्य चौकशी करण्याची मागणी केली होती. यानंतर गुन्हे शाखेचे प्रभारी आणि मुंबई पोलिस सहआयुक्त यांच्या आदेशानुसार हे प्रकरण सायबर सेलऐवजी गुन्हे शाखेच्या क्राइम इंटेलिजन्स युनिटकडे (सीआययू) सोपविण्यात आला आहे. कंगना रणौतने याप्रकरणी आपली प्रतिक्रिया दिली आहे. कंगनाने ट्वीट करून लिहिले की, 'रडण्याची कहाणी पुन्हा सुरू झाली आहे. आमच्या ब्रेकअपला आणि त्याच्या घटस्फोटाला किती वर्षे झाली, पण तो पुढे जाण्यास तयार नाही. कोणत्याही महिलेला डेट करायलाही तयार नाही.' तिने पुढे लिहिलं की, 'जसं मी माझ्या वैयक्तिक आयुष्यावर लक्ष केंद्रित करण्याचा प्रयत्न करते, तो पुन्हा तेच सर्व नाटक सुरू करतो. हृतिक रोशन, एका छोट्याशा अफेअरवर किती वर्ष रडशील.' हृतिक रोशन याला २०१३ ते २०१४ दरम्यान जवळपास १०० ईमेल मिळाले होते. यावेळी त्याने स्पष्ट केलं होतं की, ते सर्व ईमेल कंगनाच्या मेल आयडीवरून पाठवण्यात आले होते. याच प्रकरणात हृतिकने २०१७ मध्ये सायबर सेलमध्ये तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कंगनाने तिचा ईमेल हॅक झाला असून तिने हृतिकला कधीही ईमेल पाठवले नसल्याचं सांगितलं होतं.