
मुंबईः येथील गणेश गल्ली परिसरात गॅस सिलेंडरचा स्फोट झाला असून यामध्ये १६ जण भाजले आहेत, अशी माहिती समोर येत आहे. या सर्वांवर केईएम रुग्णालयात उपचार सुरु असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येत आहे. लालबाग येथे साराभाई इमारत येथे सिलेंडरचा स्फोट झाला आहे. या स्फोटात १६ जण जखमी झाले आहेत. स्फोटाची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. इमारतीतील बंद खोलीत हा स्फोट झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. या घटनेमुळं परिसरात मोठी खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. दरम्यान, स्फोट कसा झाला? ती खोली कोणाची आहे? याविषयी अद्याप सविस्तर माहिती मिळालेली नाहीये.