सेन्सेक्स-निफ्टीचा यू-टर्न ; ३०० अंकांची झेप , बाजारात खरेदीचा ओघ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, December 11, 2020

सेन्सेक्स-निफ्टीचा यू-टर्न ; ३०० अंकांची झेप , बाजारात खरेदीचा ओघ

https://ift.tt/3a0YB7W
मुंबई : नफेखोरीतून आज बाजार सावरला आहे. आज शेअर बाजारात खरेदीचा ओघ सुरु असून त्याने सेन्सेक्स आणि निफ्टीला बळ मिळाले आहे. सेन्सेक्सने ३०० अंकांची वाढ नोंदवली. तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा ७० अंकांनी वधारला आहे. मुंबई शेअर बाजाराच्या मंचावर ३० पैकी २६ शेअर तेजीत आहेत. तर चार शेअर घसरले आहेत. ओएनजीसी, एनटीपीसी, टाटा स्टील, एचयूएल, एसबीआय, अल्ट्रा टेक सिमेंट, पॉवरग्रीड, भारती एअरटेल , एचडीएफसी , मारुती, रिलायन्स इंडस्ट्रीज, कोटक बँक, आयसीआयसीआय बँक या शेअरमध्ये वाढ झाली आहे. तर ऍक्सिस बँक, टेक महिंद्रा, एशियन पेंट्स, इन्फोसिस या शेअरमध्ये घसरण झाली आहे. आज सलग दुसऱ्या सत्रात आशियातील बहुतांश भांडवली बाजारात दबाव दिसून आला. अमेरिकेत आर्थिक पॅकेजबाबतची संदिग्धता कायम आहे. त्यामुळे आर्थिक संकट कमी झालेलं नाही. परिणामी गुरुवारी अमेरिकेतील एस अँड पी ५००, डाउजोन्स, नॅसडॅक या शेअर निर्देशांकात घसरण झाली. आज आशियातील ऑस्ट्रेलिया, जपानच्या निक्केई, शांघाई कम्पोझिट इंडेक्स आणि हँगसेंग या शेअर निर्देशांकात घसरण झाली आहे. सेन्सेक्सने बुधवारी ४६ हजारांचा पल्ला ओलांडला होता. सलग सात सत्रात सेन्सेक्स आणि निफ्टीने तेजी कायम राखली होती. यामुळे नफेखोरी होईल, असा अंदाज शेअर बाजार विश्लेषकांनी व्यक्त केला होता. गुरुवारी बाजार बंद होताना सेन्सेक्स १४२ अंकांनी घसरला. तो ४५९५९ अंकांवर स्थिरावला. निफ्टी ५० अंकांच्या घसणीसह १३४७८ अंकावर बंद झाला होता. काल चलन बाजारात डॉलरच्या तुलनेत रुपयात देखील अवमूल्यन झाले. रुपयाचे मूल्य डॉलरसमोर ९ पैशांनी घसरले. तो ७३.६६ वर बंद झाला होता.