'श्रीकांत बशीर'मध्ये गश्मीर महाजनीचे जबरदस्त स्टंट्स - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 13, 2020

'श्रीकांत बशीर'मध्ये गश्मीर महाजनीचे जबरदस्त स्टंट्स

https://ift.tt/382ygUz
मुंबई: मराठमोळा अभिनेता हिंदी मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. इतकंच नाही तर तो आता एका हिंदी वेब सीरिजमध्ये झळकला आहे. ''असं या सिरीजचं नाव आहे. 'श्रीकांत बशीर' या सीरिजमध्ये प्रेक्षकांना जबरदस्त अॅक्शन ड्रामा पाहायला मिळत आहे. शहरावर एका घातक विषाणूचं संकट ओढावलं असतं. या संकटापासून शहराला वाचवण्यासाठी श्रीकांत आणि बशीर (गश्मीर महाजनी आणि युधिष्ठिर सिंह)हे दोन अधिकार काम करत असतात. यांच्या अवतीभोवती ही सीरिज फिरते. अॅक्शन प्रकारातील ही सीरिज असून या सीरिजमधील स्टंट्स ही लक्षवेधी ठरत आहे.अनेकदा स्टंट्स करण्यासाटी बॉडी डबलचा उपयोग केला जातो. पण, या सीरिजमध्ये या कलाकारांनीच स्वत: स्टंट्स केले आहेत. गश्मीर आणि युधिष्ठिर यांच्यासोबतच अभिनेत्री पूजा गोर ही देखील या सीरिजमध्ये महत्त्वाच्या भूमिकेत दिसत आहेत. सोनी लिव्हवर प्रेक्षकांना ही सीरिज पाहता येईल.