राजनाथ सिंह म्हणतात, आजमावून तर पाहा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 26, 2020

राजनाथ सिंह म्हणतात, आजमावून तर पाहा

https://ift.tt/34JIuZg
वृत्तसंस्था, नवी दिल्ली : आंदोलक शेतकऱ्यांविषयी आम्हाला कमालीचा आदर असून केंद्र सरकारने लागू केलेले नवे शेतकऱ्यांनी एक प्रयोग म्हणून वर्षभर किंवा दोन वर्षे आजमावून पाहावेत, असे आवाहन भाजप नेते व केंद्रीय संरक्षणमंत्री यांनी शुक्रवारी केले. हे कायदे लाभदायक नाहीत असे आढळले तर केंद्र सरकार त्यात आवश्यक सुधारणा करेल, अशी ग्वाहीही त्यांनी दिली. नवी दिल्लीतील द्वारका येथे एका सभेत ते बोलत होते. कृषी कायद्यांविरोधात आंदोलन करणारे सर्व शेतकरीच आहेत. आम्हाला त्यांच्याविषयी कमालीचा आदर आहे. मी स्वत: एका शेतकऱ्याचा मुलगा आहे. शेतकऱ्यांसाठी मारक ठरेल अशी एकही गोष्ट मोदी सरकार करणार नाही याची शेतकऱ्यांनी खात्री बाळगावी. या कायद्यांवरून काही जण शेतकऱ्यांची दिशाभूल करत आहेत. मात्र त्यातील एकही तरतूद शेतकरीविरोधी नाही, असे ते म्हणाले. हमीभावाची हमी नव्या कृषी कायद्यांमुळे हमीभावावर गंडांतर येणार असल्याचा अपप्रचार सुरू आहे. मात्र या कायद्यांतही हमीभावाची सुरक्षा देण्यात आली आहे. त्यामुळे किमान १-२ वर्षे या कायद्याची अंमलबजावणी होऊ दे. त्यानंतर तो लाभदायक आहे की नाही त्याचा आढावा घ्या, असे आवाहन राजनाथ यांनी केले.