गुंतवणूकदारांची चांदी; ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज'च्या शेअरची जबरदस्त नोंदणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 24, 2020

गुंतवणूकदारांची चांदी; ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज'च्या शेअरची जबरदस्त नोंदणी

https://ift.tt/38uHUiZ
मुंबई : एका शेअरसाठी तब्बल १९८ जणांनी अर्ज केलेल्या ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज'च्या शेअरने आज गुरुवारी दोन्ही शेअर बाजारात अपेक्षेनुसार जोरदार नोंद केली. ( List today with 70 percent premium)‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज' चा शेअरने इश्यू प्राईसच्या ७० टक्के जादा दराने नोंद केली. शेअर वाटपात (Share Allotment) शेअर पदरी पडलेल्या भाग्यवान गुंतवणूकदारांची यामुळे चांदी झाली. आज मुंबई शेअर बाजारात आणि राष्ट्रीय शेअर बाजारात मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.चा शेअर सूचीबद्ध झाला. बीएसईवर त्याने ५०१ रुपयावर नोंद झाली. तो ७३.९ टक्क्यांच्या वाढीसह सूचीबद्ध झाला. एनएसईवर तो ५०० रुपयांवर नोंद झाली. त्यात ७३.६ टक्क्यांची वाढ झाली. दिवसभरात त्याने ६०१.२० रुपयांचा उच्चांक गाठला. 'आयपीओ'साठी एक शेअरसाठी २८८ रुपये निश्चित करण्यात आले होते. मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.च्या समभाग विक्री योजनेत अर्ज सादर केलेल्या गुंतणूकदारांना मंगळवारी शेअर वाटप करण्यात आले. आज गुरुवारी त्याची बाजारात दणक्यात नोंदणी झाली. त्यानंतर बुधवारपासून शेअर प्राप्त न झालेल्या गुंतवणूकदारांना परतावा देण्यास सुरुवात झाली. ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.चा आयपीओ गेल्या आठवड्यात खुला झाला. दोन दिवसांत तो पूर्ण सबस्क्राईब झाला. या प्रारंभिक समभाग विक्री योजनेतून १,३२,३६,२११ शेअर इश्यू करणार आहे. प्रत्यक्षात गुंतवणूकदारांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले आहेत. ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.चा आयपीओ १९८ पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला आहे. याआधी बर्गर किंगचा आयपीओ १५७ पटीने ओव्हर सबस्क्राईब झाला होता. मात्र ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.चा आयपीओ हा चालू वर्षात सर्वाधिक सबस्क्राईब झालेला आयपीओ ठरला आहे. दरम्यान, काळ्या बाजारात (ग्रे मार्केट) ‘मिसेस बेक्टर्स फूड स्पेशालिटीज लि.च्या शेअरचा भाव ८० टक्क्यांनी वाढला आहे. एका शेअरसाठी 'ग्रे मार्केट'मध्ये २३० रुपयांवर गेला होता. नव्याने शेअर बाजारात सूचीबद्ध होणाऱ्या शेअरची एका ठराविक किंमतीत खरेदी करण्याची हमी इच्छुकांकडून दिली जाते. हे सर्व व्यवहार नोंदणी पूर्वी होतात. त्याला वायदे बाजाराच्या भाषेत ग्रे मार्केट बोलतात.