
मेलबर्न: ऑस्ट्रेलिया विरुद्ध सुरू असलेल्या सामन्यात भारताचे नेतृत्व ( ) करत आहे. त्याच्या कर्णधारपदाचे अनेक जण कौतुक आहेत. पण फक्त कर्णधार म्हणून नव्हे तर अजिंक्यने एक फलंदाज म्हणून शानदार कामगिरी केली. अजिंक्यने पहिल्या डावात ११२ धावांची शतकी खेळी केली. बॉक्सिंग डे कसोटीत दोन वेळा शतक करणारा तो पहिला भारतीय खेळाडू ठरला आहे. वाचा- अजिंक्यच्या या शतकी खेळीचे कौतुक फक्त भारताचे माजी खेळाडू करत नाही तर ऑस्ट्रेलियाचे खेळाडू करत आहेत. कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी अजिंक्यने गोलंदाजांचा सुरेख वापर करून घेतला आणि त्याने क्षेत्ररक्षण देखील चांगली लावली होती. यावर बोलताना भारताचे माजी कर्णधार सुनिल गावस्कर यांनी मी त्याचे कौतुक करणार नाही. कारण माझ्यावर मुंबईच्या खेळाडूला पठिंबा देत असल्याचा किंवा अन्य कोणता तरी आरोप केला जाईल, असे म्हणाले होते. वाचा- तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी मात्र गावस्करांना रहाणेने झळकावलेल्या शतकावर त्याचे कौतुक करण्यापासून स्वत:ला रोखता आले नाही. अजिंक्यने अतिशय सावध सुरुवात केली. कारण भारताच्या सलग दोन विकेट पडल्या होत्या आणि त्याला डाव सावरायचा होता. त्याने प्रथम हनुमा विहारी सोबत अर्धशतकी भागिदारी केली. त्यानंतर ऋषभ पंत सोबत धावांचा वेग वाढवला. पंतमुळे रहाणेने धावांचा वेग अधिक केला. त्यानंतर रविंद्र जडेजा सोबत भागिदारी करताना त्याने शतक पूर्ण केले. वाचा- अजिंक्यने झळकावलेले शतक हे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात महत्त्वाचे शतक आहे. हे शतक यासाठी महत्त्वाचे आहे कारण त्यातून खेळाडूचे चरित्र दिसते. त्याचे हे शतक प्रतिस्पर्धी संघाला संदेश देतो की, गेल्या सामन्यात फक्त ३६ वर ऑल आउट झाल्यानंतर अशा पद्धतीने कमबॅक करून भारतीय संघ झुकणार नाही. हा संदेश रहाणेच्या शतकाने दिला आहे. म्हणूनच हे शतक सर्वात महत्त्वाचे आहे भारतीय क्रिकेटच्या इतिहासातील, असे गावस्कर म्हणाले. वाचा- अजिंक्यने २२३ चेंडूत १२ चौकारांसह ११२ धावा केल्या. त्याने जडेजासोबत सहाव्या विकेटासाठी १२१ धावांची भागिदारी केली. जडेजाने ५७ धावा केल्या. या दोघांमुळे भारताला पहिल्या डावात १३१ धावांची आघाडी घेता आली.