अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदी जनरल ऑस्टिन; पहिलेच कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 8, 2020

अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदी जनरल ऑस्टिन; पहिलेच कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री

https://ift.tt/3glBiHg
वॉशिंग्टन: अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आपल्या मंत्रिमंडळात संरक्षण मंत्रिपदाची जबाबदारी जनरल (निवृत्त) लॉयड ऑस्टीन यांच्याकडे सोपवण्याचा निर्णय घेतला आहे. लॉयड यांच्या निवृत्तीची घोषणा झाल्यास ते अमेरिकेचे पहिले कृष्णवर्णीय संरक्षण मंत्री असणार आहेत. युद्धात दमदार कामगिरी केल्यानंतर पेंटागॉनमध्ये संरक्षण मंत्रीपदाची जबाबदारी सांभाळणारे हे पहिलेच संरक्षण मंत्री असणार आहेत. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रिपदासाठी अनेकांची नावे चर्चेत होती. अमेरिकन वृत्त संकेतस्थळ पोलिटिकोने दिलेल्या वृत्तानुसार, युद्धभूमीवर सैन्याच्या एका तुकडीचे नेतृत्व करणारे लॉयड हे पहिले कृष्णवर्णीय जनरल होते. अमेरिकेच्या सेंट्रल कमांडमधून वर्ष २०१६ मध्ये निवृत्त झालेले जनरल लॉयड ऑस्टिन हे संरक्षण मंत्रिपदासाठी प्रबळ दावेदार होते. संकटकाळात ऑस्टिन हे विश्वासावर खरे उतरल्यामुळेच बायडन यांनी त्यांना ही जबाबदारी दिली असल्याची चर्चा आहे. अमेरिकन लष्करात त्यांना मोठा मान आहे. बायडन हे उपराष्ट्रपती असताना ऑस्टिन यांच्यासह त्यांनी काम केले आहे. ऑस्टिन यांनी इराकमध्येदेखील जबाबदारी पार पाडली आहे. वाचा: वाचा:आरोग्यमंत्रिपदी अॅटर्नी जनरल झेवियर बेसेरा अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आरोग्यमंत्रिपदी कॅलिफोर्नियाचे अॅटर्नी जनरल झेवियर बेसेरा यांची नियुक्ती केली आहे. बेसेरा हे किफायतशीर आरोग्य देखभालीसंबंधी कायदा लागू करण्याच्या नीतीचे समर्थक आहेत. आता ते बायडेन प्रशासनामध्ये करोना संकटाविरोधात देशात सुरू असलेल्या मोहिमेत महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. सिनेटची मंजुरी मिळाल्यानंतर आरोग्य आणि मानव सेवा खात्याचे नेतृत्व करणारे ते पहिले लॅटिन अमेरिकी असतील. ट्रम्प प्रशासनाने अलीकडेच ‘ओबामा केअर’ रद्द करण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी बेसेरा यांनी त्याला विरोध केला होता. हे प्रकरण सध्या सर्वोच्च न्यायालयात असून पुढील वर्षी त्याचा निकाल येणे अपेक्षित आहे. २००९-२०१९ दरम्यान तत्कालीन राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांच्या आरोग्य कायद्याला पाठबळ देण्याचे महत्त्वाचे काम बेसेरा यांनी केले आहे. वाचा: न्यूयॉर्कमधील शाळा सुरू करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर बंद केलेल्या न्यूयॉर्कमधील शाळा सोमवारी पुन्हा सुरू करण्यात आल्या आहेत. प्रीस्कूल, केजी ते पाचवीपर्यंतच्या मुलांच्या पालकांनी शाळा आणि दूरस्थ शिक्षण असा दुहेरी पर्याय स्वीकारला आहे. माध्यमिक आणि उच्च माध्यमिक वर्ग नाताळच्या सुट्टीनंतरच सुरू होणार आहेत. सध्या शहरातील करोना रुग्णदर पाच टक्के आहे. मात्र शाळा आवश्यक त्या नियमांचे पालन करून सुरू केल्याची माहिती महापौर बिल डी ब्लासिओ यांनी दिली.