पोस्टाचे बचत खातेदार आहात; किमान शिल्लक ठेवली नाही तर होईल तुम्हाला दंड - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 5, 2020

पोस्टाचे बचत खातेदार आहात; किमान शिल्लक ठेवली नाही तर होईल तुम्हाला दंड

https://ift.tt/3gajoHo
नवी दिल्ली : पोस्ट ऑफिस बचत खातेधारकांसाठी एक महत्वाची बातमी आहे. येत्या ११ डिसेंबरपासून पोस्टाच्या बचत खात्यात किमान ५०० रुपयांची शिल्लक रक्कम ठेवणे बंधनकारक होणार आहे. तसे न केल्यास त्यावर १०० रुपयांची अकाउंट मेंटेनन्स चार्ज (शुल्क) वसूल केले जाणार आहे. या नियमावलीचा ग्रामीण भागातील ग्राहकांना मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. भारतीय टपाल खात्याच्या वेबसाईटनुसार ११ डिसेंबरपर्यंत टपाल बचत खात्यात ग्राहकांना किमान ५०० रुपयांची शिल्लक ठेवावी लागेल. त्यांनतर नसलेल्या खात्यावर दंडात्मक शुल्क वसूल केले जाणार आहे. जर त्याहून कमी रक्कम असेल तर दंड वसूल केला जाणार नाही. मात्र या आर्थिक वर्षाअखेर खात्यात ५०० पर्यंत शिल्लक वाढवली नाही तर १०० रुपयांचा दंड वसूल केले जातील. एखाद्या खात्याची शिल्लक शून्य झाल्यास ते बचत खाते बंद होणार आहे. गेल्या महिन्यात सार्वजनिक क्षेत्रातील बँक ऑफ बडोदाने पैसे काढणे आणि जमा करणे यावर शुल्क आकारण्याचा निर्णय घेतला होता, मात्र त्याला ग्राहकांकडून विरोध झाल्यानंतर बँकेला हा निर्णय मागे घ्यावा लागला. आता पोस्टाच्या बचत खात्यातील किमान शिल्लकीच्या नियमाचा सर्वसामान्य खातेदारांना फटका बसण्याची शक्यता आहे. पोस्टाच्या बचत खात्यावर वर्षाला ४ टक्के व्याज दिले जाते. १० वर्षे आणि त्याहून अधिक वयाच्या मुलांचे पालकांच्या माध्यमातून खाते सुरु करता येते. बचत खाते सुरु करताना किमान ५०० रुपयांची आवश्यकता आहेत. तर या खात्यातून किमान ५० रुपये काढण्याची सुविधा आहे.