मुंबई : नवीन करोना व्हायरसच्या दहशतीने जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत आहेत. मात्र स्थानिकी पातळीवर इंधन दर स्थिर आहेत. आज सलग १७ व्या दिवशी पेट्रोलियम कंपन्यांनी इंधन दर स्थिर ठेवले आहेत. आज मुंबईत पेट्रोलचा भाव एक लिटरसाठी ९०.३४ रुपये आहे. ८०.५१ रुपये आहे. दिल्लीत पेट्रोलने ८३ रुपयांचा टप्पा ओलांडला आहे. दिल्लीत पेट्रोलचा भाव ८३.७१ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ७३.८७ रुपये आहे. त्याशिवाय चेन्नईत देखील आज पेट्रोल आणि डिझेलमध्ये वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव ८६.५१ रुपये झाला असून डिझेल ७७.४४ रुपये झाले आहे. कोलकात्यात एक लिटर पेट्रोलचा भाव ८५.१९ रुपये असून डिझेल ७७.४४ रुपये आहे. मंगळवारी, डब्ल्यूटीआय क्रूडचे दर ४७ डॉलर प्रति बॅरलवर किंवा १.५१ टक्क्यांनी घसरले. कोरोना रुग्णांतील नव्याने वाढीमुळे बाजारात भीती निर्माण झाली आहे. दरम्यान, आज बुधवारी कच्च्या तेलाच्या किमतीत सुधारणा झाली आहे. सिंगापूरमध्ये कच्च्या तेलाचा भाव प्रती बॅरल १८ सेंट्सने वाढला आणि ४८.३० डाॅलर झाल. क्रूड आॅईलचा भाव प्रती बॅरल ४१.४० डाॅलर प्रती बॅरल आहे. अमेरिकी धोरणकर्त्यांनी आर्थिक पॅकेजवर करार करत असल्याचे दर्शवल्याने बाजारातील नुकसान मर्यादित राहिले. त्यासोबत, अमेरिकी क्रूडचे घसरलेले स्टॉक्स आणि आर्थिक स्थिती सुधारण्याविषयीचा आशावाद यामुळे मागील आठवड्यात दर वाढले. एनर्जी इन्फॉर्मेशन अॅडमिनिस्ट्रेशनच्या अहवालानुसार, मागील आठवड्यात अमेरिकी क्रूड साठ्यात ३.१ दशलक्ष बॅरलची वाढ झाली. वाढत्या कोरोना रुग्णांमुळे तसेच नव्या लॉकडाऊनच्या मालिकेमुळे तेलाच्या दरांना आणखी नुकसान सहन करावे लागू शकते , असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.