ईडी, सीबीआयचा वापर राजकारणासाठीच; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 27, 2020

ईडी, सीबीआयचा वापर राजकारणासाठीच; सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांचा आरोप

https://ift.tt/3mTbK5I
म. टा. प्रतिनिधी, मुंबई राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते, माजी मंत्री यांना ईडीची नोटीस मिळाल्याचे त्यांनी जळगाव जिल्ह्यातील एका कार्यक्रमात मान्य केल्यानंतर, उच्चपदस्थांच्या भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठविणाऱ्या ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या यांनी तिखट प्रतिक्रिया दिली आहे. 'खडसे यांना ईडीची नोटिस पाहता या सर्व गोष्टी फक्त राजकारणासाठीच होतात. मी २०१६ पासून लढत आहेत. आता ईडीला जाग आली का,' असा सवाल त्यांनी केला. त्याच्याशी माझे काही देणे घेणे नाही, असे दमानिया यांनी आवर्जून नमूद केले आहे. 'खान्देशातील तत्कालीन मंत्री एकनाथ खडसे यांच्याशी संबंधित पुण्यानजीक भोसरी एमआयडीसीमधील कथित भूखंड गैरव्यवहाराच्या आरोपाबाबत आपण २०१६ सालीच लेखी तक्रार केली होती. तथापि, , सीबीआय आणि पोलिस या तपास यंत्रणांचा सर्रास वापर राजकारणासाठी होत आहे. खडसे यांनी आपल्याला ईडीची नोटीस मिळाली नाही असे आधी म्हटले होते. पण याच्याशी मला काहीही घेणे देणे नाही. आमच्या दोन याचिका न्यायालयात आहेत. ईडीने याची सर्रास चौकशी करावी. ईडीने स्टेटमेंटसाठी बोलावले की मी नक्कीच जाणार,' असेही त्या म्हणाल्या. 'काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादी हे तिघेही केंद्रीय यंत्रणांचा गैरवापर करतात. जे भ्रष्टाचाराच्या विरोधात लढा देतात. अशा आमच्यासारख्यांना मात्र बदनाम केले जाते,' असे अंजली दमानिया म्हणाल्या. मी २०१६ पासून लढत आहेत. आता ईडीला जाग आली का, असा सवाल त्यांनी केला. तपास यंत्रणांचा सर्रास गैरवापर होत असेल तर न्यायालयात ईडी, सीबीआयच्या विरोधात याचिका दाखल करायला हवी, मी स्वत: याबद्दल विचार करणार आहे असेही अंजली दमानिया यांनी सांगितले. भ्रष्टाचाराच्या विरोधातील लढ्याला आता काही अर्थ उरला नाही, असेही त्या उद्वेगाने म्हणाल्या.