ऑस्ट्रेलिया भूमीतील पहिला कसोटी विजय; हा खेळाडू ठरला होता हिरो - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Tuesday, December 15, 2020

ऑस्ट्रेलिया भूमीतील पहिला कसोटी विजय; हा खेळाडू ठरला होता हिरो

https://ift.tt/3a6Dm4O
नवी दिल्ली: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेला १७ डिसेंबरपासून सुरूवात होणार आहे. पहिली कसोटी डे-नाइट असून ती एडिलेट मैदानावर होईल. गेल्या वेळी भारतीय क्रिकेट संघाने विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियामध्ये कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम केला होता. अशी कामगिरी करणारा भारत आशियातील पहिला देश ठरला होता. या वर्षी देखील चुरशीची लढत होण्याची आशा आहे. पहिल्या कसोटी सामन्याआधी भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलियातील पहिल्या कसोटी विजयाबद्दल जाणून घेऊयात... वाचा- भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात १९७७ साली पहिला विजय मिळवला होता. दोन्ही संघात मेलबर्न क्रिकेट मैदानावर झालेल्या सामन्यात भारताने २२२ धावांनी दणदणीत विजय साकारला होता. भारतीय सघाने १९४७-४८ साली प्रथम ऑस्ट्रेलियाचा दौरा केला होता. तेव्हा लाला अमरनाथ भारतीय संघाचे कर्णधार होते. तर ऑस्ट्रेलियाचे नेतृत्व सर डोनाल्ड ब्रॅडमन करत होते. पण भारतीय संघाला ऑस्ट्रेलियात पहिला कसोटी विजय मिळवण्यासाठी १९७७ सालापर्यंत वाट पाहावी लागली. तेव्हा भारताचे कर्णधार होते. वाचा- १९७७ साली भारतीय संघ पाच सामन्यांच्या मालिकेत ०-२ असा पिछाडीवर होता. तिसऱ्या कसोटीत कर्णधार बिशन सिंह बेदी यांनी टॉस जिंकला आणि प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. भारताकडून सलामीवीर सुनील गावसकर आणि चेतन चौहान यांना भोपळा देखील फोडता आला नाही. त्यानंतर अमरनाथ यांनी ७२ आणि गुंडप्पा विश्वनाथ यांनी ५९ धावा केल्या. यामुळे भारताने २५६ धावापर्यंत मजल मारली. गोलंदाजीत यांनी सहा विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव २१३वर संपुष्ठात आणला. वाचा- दुसऱ्या डावात भारताकडून सुनिल गावसकर यांनी ११८ धावांची शतकी खेळी केली. तर गुंडप्पा विश्वनाथ यांनी ५४ धावांची आणखी एक अर्धशतकी खेळी केली. भारताने दुसऱ्या डावात ३४३ धावा केल्या आणि ऑस्ट्रेलिया समोर विजयासाठी ३८७ धावांचे लक्ष्य ठेवले. पहिल्या डावा प्रमाणे दुसऱ्या डावात देखील चंद्रशेखर यांनी ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजांना मैदानावर टीकू दिले नाही. त्यांनी पाच विकेट घेतल्या तर बेदी यांनी चार विकेट घेत ऑस्ट्रेलियाचा डाव १६४ धावांवर संपुष्ठात आणला. भारताने या सामन्यात २२२ धावांनी विजय साकारला. ऑस्ट्रेलिया भूमीवरील हा भारताचा पहिला विजय होता.