नवी दिल्ली: भारतासह जगभरातील १८० देशांमध्ये करोनाचे संकट () घोंघावत आहे. आतापर्यंत जगभरात एकूण ७.४९ कोटींहून अधिक लोकांना करोनाची लागण झालेली आहे. तर या विषाणूने (Coronavirus) आतापर्यंत १६.६१ लाख लोकांचे बळी घेतले आहेत. भारतात देखील दररोज करोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होताना दिसत आहे. भारतात करोनाची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ९९ लाखांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयाने () आज सकाळी प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, देशात करोनाचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ९९ लाख ७९ हजार ४४७ इतकी झाली आहे. गेल्या २४ तासांमध्ये (गुरुवारी सकाळी ८ ते शुक्रवारी सकाळी ८ वाजेपर्यंत) करोनाचे २२,८९० इतके रुग्ण वाढले आहेत. ( in india latest updates) गेल्या २४ तासांमध्ये ३१ हजार ८७ रुग्णांना बरे झाल्यानंतर घरी सोडण्यात आले. या दरम्यान ३३८ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत एकूण ९५ लाख २० हजार ८२७ रुग्ण बरे झालेले आहेत. तर आतापर्यंत एकूण १ लाख ४४ हजार ७८९ लोकांचे प्राण गेलेले आहेत. देशात करोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या ३.५ लाखांच्या खाली आहे. ही संख्या एकूण ३ लाख १३ हजार ८३१ इतकी आहे. रुग्ण बरे होण्याबाबत बोलायचे झाल्यास हा दर ९५.४० इतका आहे. हा दर आतापर्यंतचा सर्वाधिक आहे. पॉझिटीव्हीटीचा दर ३.१४ टक्के इतका आहे. तर मृत्युदर १.४५ इतका आहे. १७ डिसेंबरला ११,१३,४०६ इतक्या करोनाच्या नमुन्यांची चाचणी घेण्यात आल्या. आतापर्यंत एकूण १५,८९,१८,६४६ इतक्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. क्लिक करा आणि वाचा- करोनाचा संसर्ग होऊन आता एक वर्षांता काळ होत आहे. मात्र अजूनही या आजाराचा अंत दृष्टीपथात येत नाही. मात्र संसर्गाची साखळी पुढील सहा महिन्यांमध्ये तोडता येऊ शकते असे एम्स दिल्लीचे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांचे म्हणणे आहे. क्लिक करा आणि वाचा- क्लिक करा आणि वाचा-