'मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत'; आंदोलनाला पाठिंबा देत DGI चा राजीनामा - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, December 13, 2020

'मी माझ्या शेतकरी बांधवांसोबत'; आंदोलनाला पाठिंबा देत DGI चा राजीनामा

https://ift.tt/3ngN3kH
चंदीगड: शेतकऱ्यांचे आंदोलन () सुरू असताना पंजाबच्या एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने राजीनामा दिला आहे. (Lakhvinder singh Jakhar)असे या वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याचे नाव असून ते (तरुंग) आहेत. आपण शेतकरी बांधवांच्या सोबत असल्याचे सांगत त्यांनी हा राजीनामा दिला आहे. शेतकऱ्यांना समर्थन देत त्यांनी आपला राजीनामा राज्याच्या प्रधान सचिवांकडे (गृह) सुपूर्द केला आहे. (DIG of panjab resigns in support of farmers) जाखड यांनी प्रधान सचिवांना पत्र लिहत सेवेतून अकाली सेवानिवृत्ती घेत असल्याचे म्हटले आहे. केंद्रीय कृषी कायद्यांच्या विरोधात शांततेच्या मार्गाने आंदोलन करणाऱ्या शेतकरी बांधवांसोबत मी आहे आणि याच कारणासाठी आपण राजीनामा देत असल्याचे जाखड यांनी राजीनामा देताना म्हटले आहे. या बाबत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, लखविंदर जाखड हे सध्या निलंबित आहेत. काही महिन्यांपूर्वी तुरुंग अधिकाऱ्याकडून कथित स्वरुपात लाच स्वीकारण्याच्या आरोपाखाली ते निलंबित आहेत. याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सरकारने अद्याप त्यांचा राजीनामा स्वीकारलेला नाही. क्लिक करा आणि वाचा बातमी- पंजाबमध्ये शेतकऱ्यांच्या आंदोलनाला लोकांचा मोठा पाठिंबा मिळत आहे. क्रीडाक्षेत्रापासून ते साहित्य आणि राजकारणापर्यंतच्या दिग्गजांनी खुलेपणाने शेतकऱ्यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. हॉकी संघाचे माजी कर्णधार परगट सिंह यांच्यासह १२ हून अधिक खेळाडूंनी आपला सन्मान परत केला आहे. क्लिक करा आणि वाचा बातमी- क्लिक करा आणि वाचा बातमी-