IND vs AUS: लाजीरवाण्या कामगिरीनंतर रवी शास्त्रींना हटवा, नेटकऱ्यांनी प्रशिक्षकपदासाठी सुचवला हा पर्याय - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, December 19, 2020

IND vs AUS: लाजीरवाण्या कामगिरीनंतर रवी शास्त्रींना हटवा, नेटकऱ्यांनी प्रशिक्षकपदासाठी सुचवला हा पर्याय

https://ift.tt/3p6reov
अॅडलेड : : भारतीय संघाने तिसऱ्या दिवशी लाज काढली. कारण भारतीय संघावर आतापर्यंतच्या इतिहासातील सर्वात कमी धावसंख्या करण्याची नामुष्की ओढवली. भारतीय संघाला दुसऱ्या डावात फक्त ३६ धावा करता आल्या आणि त्यानंतर सोशल मीडियावर चाहत्यांनी भारतीय संघाचा चांगलाच क्लास घेतला. यावेळी सर्वाधिक चाहत्यांनी मागणी केली ती भारताचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना हटवण्याची. पण त्याचबरोबर शास्त्री यांना हटवून कोणाच्या हाती प्रशिक्षकपद द्यायला हवे, हेदेखील नेटकऱ्यांनी यावेळी सुचवले आहे. रवी शास्त्री हे फार आक्रमक आहेत, त्यामुळे यापुढे त्यांच्या हातामध्ये भारतीय संघाचे भवितव्य सोपवू नये, अशी मागणी यावेळी सोशल मीडियावर पाहायला मिळाली. त्याचबरोबर जर शास्त्री यांनी हटवण्यात आले तर त्यांच्या जागी भारताचा माजी महान क्रिकेटपटू राहुल द्रविडची प्रशिक्षकपदी निवड करण्यात यावी, असेदेखील चाहत्यांनी यावेळी सांगितले आहे. त्यामुळे या मानहानीकारक कामगिरीनंतर रवी शास्त्री यांच्याकडून प्रशिक्षकपद काढून घेण्यात येणार आहे, हे पाहावे लागेल. भारताने कालच्या १ बाद ९ धावसंख्येवरून पुढे खेळण्यास सुरूवात केली. काल भारताने ऑस्ट्र्लियाला १९१ धावांवर रोखले होते आणि ५३ धावांची महत्त्वाची आघाडी घेतली होती. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारताने कसोटीवर पकड मिळवली होती. पण दुसऱ्या डावात भारताची विकेट एका पाठोपाठ एक पडू लागल्या. भारतीय फलंदाजांनी फक्त हजेरी लावण्याचे काम केले. भारताला दुसऱ्या डावात अवघ्या ३६ धावा करता आल्या. भारताच्या कसोटी क्रिकेटच्या इतिहासात सर्वात कमी धावसंख्येवर बाद होण्याच्या उंबरठ्यावर विराट कोहली आणि कंपनी उभी आहे. १९७४ साली इंग्लंड विरुद्ध भारताचा ४२ धावसंख्येवर ऑल आउट झाला होता. त्याआधी ऑस्ट्रेलिया विरुद्ध १९७४ साली भारताचा डाव ५८ धावांवर संपुष्ठात आला होता. भारतीय संघाला वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीच्या रुपात यावेळी मोठा धक्का बसल्याचे पाहायला मिळाले. कारण शमीला गंभीर दुखापत झाल्याचे पाहायला मिळाले आहे. त्यामुळेच जायबंदी निवृत्त होऊन शमीला पेव्हेलियनमध्ये परतावे लागले होते. २१ व्या षटकातील पॅट कमिन्सने दुसरा चेंडू बाऊन्सर टाकला होता. हा चेंडू शमी चुकवायला गेला. पण त्यावेळी हा चेंडू शमीच्या उजव्या हातावर आदळल्याचे पाहायला मिळाले.