PHOTO : लोककलावंतांसोबत मंचावर थिरकल्या ममता बॅनर्जी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, December 24, 2020

PHOTO : लोककलावंतांसोबत मंचावर थिरकल्या ममता बॅनर्जी

https://ift.tt/3pdlhX4
कोलकाता : अगोदर राज्यात अनेक राजकीय आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन होताना दिसतंय. आगामी निवडणुकीसाठी ममता बॅनर्जी यांनीही कंबर कसलीय. विरोधी पक्ष भारतीय जनता पक्षासोबतच ममता दीदींना पक्षातील बंडखोरांचीही चिंता सतावू लागलीय. परंतु, याच दरम्यान ममता दीदी हसत्या-खेळत्या अंदाजात एका मंचावर लोक-कलाकारांसोबत आणि कार्यकर्त्यांसोबत नृत्यात सहभागी होताना दिसल्या. या कार्यक्रमात यांनी अनेक लोककलावंतांचं कौतुक करत त्यांना सन्मानित केलं. यामध्ये संगीतकार, गायक आणि नृत्य कलाकारांचाही समावेश होता. कार्यक्रमात ममता बॅनर्जी यांनी संथाली नर्तिका यांना सन्मानित करताना त्यांच्यासोबत नृत्यात सहभागीही झाल्या. यावेळी, बसंती ममता दीदींना नृत्याच्या काही स्टेप्स शिकवताना दिसल्या. तर ममता बॅनर्जी या मंचावर हलक्या-फुलक्या अंदाजात थिरकताना दिसल्या. या कार्यक्रमातही ममतांनी आपल्या विरोधकांवर निशाणा लगावण्याची संधी सोडली नाही. मंचावरून उपस्थितांना संबोधताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. 'बंगालनंच देशाला राष्ट्रगीत आणि 'जय हिंद'चा नारा दिलाय. बंगालचं रुपांतर कधीही गुजरातमध्ये केलं जाऊ शकणार नाही' असा टोला ममतांनी विरोधी पक्ष भाजपला हाणलाय. भाजपकडून वारंवार बंगालमध्ये आपलं गुजरात मॉडेल आणण्याची भाषा करत आहे, त्यालाच मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलंय.