अडचणीत वाढ- केरळ हायकोर्टाने विराट- तमन्नाला पाठवली नोटीस - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, January 29, 2021

अडचणीत वाढ- केरळ हायकोर्टाने विराट- तमन्नाला पाठवली नोटीस

https://ift.tt/3iXok3C
मुंबई- केरळ उच्च न्यायालयाने ऑनलाइन रमी खेळावर कायदेशीर बंदी घालणाऱ्या याचिके संदर्भात , आणि अजु वर्गीज यांना नोटिस बजावली आहे. विराट, तमन्ना आणि अजु या रमी खेळाचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत. उच्च न्यायालयाने राज्य सरकारकडे यासंबंधीचं उत्तर मागितलं आहे. अनेक राज्यांमध्ये या खेळावर कायदेशीर बंदी तामिळनाडू सरकारनेही त्या सर्व ऑनलाइन गेम आणि अॅपवर बंदी घातली आहे ज्यात सट्टेबाजी चालते. यात ऑनलाइन रमी गेमही सामील आहे. यात ५ हजार रुपयांचा दंड आणि ६ महिन्यांचा तुरुंगवास होऊ शकतो. हे ठोस पाऊल तेव्हा उचलण्यात आलं जेव्हा एका व्यक्तीने ऑनलाइन रमी खेळात आपलं सर्वकाही गमावलं आणि अखेर त्याने आत्महत्या केली. नोव्हेंबर २०२० मध्ये कोयंबतूर येथील तीन व्यक्तींनी ऑनलाइन रमी खेळात पैसे गमावल्यानंतर आत्महत्या केली होती. अनेक राज्यांमध्ये सध्या अॅपमार्फत ऑनलाइन गेम्स खेळवले जातात. गूगलने आपल्या प्ले स्टोअरमधून असे सर्व अॅप काढून टाकले आहेत. यातच आता आंध्रप्रदेश सरकारनेही ऑनलाइन गेमिंगवर निर्बंध घातली आहेत. तसंच केंद्रशासित प्रदेश पुद्दुचेरी इथेही अशाच प्रकारच्या कारवाईची मागणी केंद्राकडे केली आहे. फक्त विराट कोहलीच नाही तर अनेक खेळ आणि सिनेसृष्टीतील सेलिब्रिटी अशा ऑनलाइन अॅप्सशी जोडले गेले आहेत. यातले काहीजण यया अॅप्सचे ब्रँड अॅम्बेसिडर आहेत तर काहींनी अशा खेळांना समर्थन दिलं आहे.