पत्नीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; पतीच्या कृत्याने सगळेच हादरले - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, January 23, 2021

पत्नीसोबत तरुणाचे अनैतिक संबंध असल्याचा संशय; पतीच्या कृत्याने सगळेच हादरले

https://ift.tt/2NqBhY1
अमरेंद्र कुमार ज्ञान/ चाइबासा: पत्नीसोबत असल्याच्या संशयावरून पतीने तरुणाला दोरखंडाने बांधून बेदम मारहाण केली. यात तरुणाचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील कुमारडुंगी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील खडबंध गावात ही धक्कादायक घटना घडली. बाटे गोप उर्फ गुरे गोप असे मृत तरुणाचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका अल्पवयीन मुलासह चौघांना अटक केली आहे. मुख्य आरोपी विष्णू पिंगुवा, अर्जुन पिंगुवा आणि बोनता बारी यांना अटक केली असून, त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. तर एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे. तरुणाचे पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय मुख्य आरोपी विष्णू पिंगुवा याला होता. त्याने तीन साथीदारांना सोबत घेऊन गोप याच्या हत्येचा कट रचला. त्याला घरातून एक किलोमीटरवर नेले. तेथे त्याला दोरखंडाने बांधले. त्यानंतर लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण केली. यात त्याचा मृत्यू झाला. त्यानंतर त्याचा मृतदेह झुडपात फेकून दिला आणि ते पसार झाले. २४ तासांच्या आत हत्येचा लावला छडा या प्रकरणात मृताची आई मिरी गोप यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, कुमारडुंगी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास सुरू केला. २४ तासांच्या आत सर्व आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील तीन आरोपींना न्यायालयीन कोठडी सुनावली असून, एका अल्पवयीन आरोपीची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.