४० दिवस शेतकरी रस्त्यावर, आंदोलक-सरकारची आज सातवी बैठक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 4, 2021

४० दिवस शेतकरी रस्त्यावर, आंदोलक-सरकारची आज सातवी बैठक

https://ift.tt/2JKEiRE
नवी दिल्ली : केंद्राकडून लागू करण्यात आलेल्या कृषी कायद्याविरोधातील शेतकऱ्यांचं आंदोलन कडाक्याची थंडी आणि अवकाळी पावसातही सुरूच आहे. याच दरम्यान केंद्र सरकार आणि शेतकरी संघटना यांच्यात आज पुन्हा एका करण्यात आलंय. आणि सरकार यांच्यातील ही सातवी बैठक आहे. त्यामुळे, आज तरी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर तोडगा निघावा अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. दरम्यान, आंदोलक शेतकरी आणि सरकारमध्ये होणाऱ्या आजच्या चर्चेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय यांनी संरक्षणमंत्री राजनाथसिंह यांची भेट घेऊन चर्चा केली. हे मुद्दे निकालात निघावेत यासाठी 'मधला मार्ग' शोधून सर्व संभाव्य पर्यायांवर चर्चा केल्याचं नरेंद्र सिंह तोमर यांनी म्हटलंय. बैठकीत जो निर्णय होईल तो देशाच्या आणि शेतकऱ्यांच्या हिताचा असेल, असंही कृषीमंत्र्यांनी म्हटलंय. आजच्या बैठकीत कृषी कायदे मागे घेण्यावर तसंच किमान हमीभावाला कायद्याचं स्वरुप देण्यावर चर्चा होणार आहे. आजच्या बैठकीत तोडगा न निघाल्यास आंदोलन आणखीन तीव्र करण्यात येईल, असा इशारा शेतकरी आंदोलनकांनी दिलाय. दिल्लीतील पारा शून्याजवळ पोहचलेला असताना गेल्या ४० दिवसांपासून करताना दिसत आहेत. त्यातच रविवारी उत्तर भारतात अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाल्यानं रस्त्यांवर कोणत्याही सोई-सुविधांशिवाय ठाण मांडून बसलेल्या या शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखीनच भर पडलीय. दरम्यान, रविवारी हरयाणात शेतकऱ्यांच्याही सहनशक्तीचा उद्रेक पाहायला मिळाला. शेतकरी आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीपर्यंत वेळ गेली. रेवाडी-अलवर सीमेवर शेकडो आंदोलनकर्ते कृषी कायद्यांविरोधात मुख्य आंदोलनात सहभागी होण्यासाठी दिल्लीला मार्च करत असताना पोलिसांनी त्यांना रोखण्याचा प्रयत्न केला. आंदोलनकर्त्यांना रोखण्यासाठी पोलिसांनी अश्रू धुराचाही वापर केला. त्यामुळे, जमाव आणखीनच चिडला. दोन शेतकऱ्यांचा मृत्यू सिंघू सीमेप्रमाणेच टिकरी सीमा, चिल्ला सीमा आणि गाझीपूर सीमेवर शेतकरी ठाण मांडून बसलेत. टिकरी सीमेवर थंडीमुळे शनिवारपासून दोन आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांनी प्राण गमावले आहेत. थंडी आणि पावसापासून वाचण्यासाठी शेतकरी वॉटरप्रूफ टेन्टचा आसरा घेत असले तरी शेकडोंच्या संख्येनं जमलेल्या सगळ्याच शेतकऱ्यांकडे हा पर्याय उपलब्ध नाही.