मुलीच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट; अल्पवयीन मुलावर 'हा' गंभीर आरोप - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, January 25, 2021

मुलीच्या अपहरण प्रकरणात ट्विस्ट; अल्पवयीन मुलावर 'हा' गंभीर आरोप

https://ift.tt/3ofcN0G
गाझीपूर: उत्तर प्रदेशातील गाझीपूर जिल्ह्यात पोलिसांनी एका १७ वर्षीय मुलावर ''च्या आरोपांखाली धर्मांतर प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मुलीच्या कुटुंबीयांनी या मुलाविरोधात आधी अपहरणाची तक्रार दाखल केली होती. अपहृत मुलगी सापडल्यानंतर तिच्या कुटुंबीयांनी आरोपी मुलावर धर्मांतरासाठी जबरदस्ती केल्याचा आरोप केला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, २१ जानेवारीला येथील गहमर पोलीस ठाण्यात एका कुटुंबाने आपल्या मुलीचे झाल्याची तक्रार दिली होती. अन्य समाजातील अल्पवयीन मुलाने तिचे अपहरण केल्याचा आरोप त्यांनी केला होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करून २२ जानेवारी रोजी मुलाला अटक केली. अटकेनंतर अपहृत मुलीलाही ताब्यात घेतले. पोलिसांनी आरोपी अल्पवयीन मुलाविरोधात धर्मांतर प्रतिबंध कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला आहे. गहमरचे पोलीस निरीक्षक दिलीप कुमार सिंह यांच्या माहितीनुसार, मुलीच्या कुटुंबीयांनी नव्याने तक्रार दाखल केली. धर्मांतरासाठी मुलीचे अपहरण करण्यात आल्याचा आरोप त्यांनी तक्रारीत केला. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी मुलाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या मुलावर आरोप करण्यात आले आहेत, तो मुलगा अल्पवयीन आहे. त्याचे वय १७ वर्षे आहे. आरोपीला जेजेबीसमोर (जुवेनाइल जस्टिस बोर्ड) हजर करण्यात आले आहे. त्यानंतर त्याची कोठडीत रवानगी करण्यात आली आहे. या प्रकरणात सोमवारी पीडित मुलीचा जबाब मॅजिस्ट्रेटसमोर नोंदवून घेतला जाईल.