कृषी कायद्यांच्या विरोधात गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांना पाठिंबा म्हणून आज मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन होत आहे. विविध शेतकरी संघटनांसह महाविकास आघाडीतील अनेक पक्षही आंदोलनात सहभागी झाले आहेत. या आंदोलनाविषयीचे सर्व अपडेट्स: आंदोलनाचे Live Updates: >> आझाद मैदानातील गर्दीचे दृश्य >> आझाद मैदानातील आंदोलनाला 'पब्लिसिटी स्टंट' म्हणणाऱ्या रामदास आठवले यांनी माफी मागावी, राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी >> राज्यपाल भगतसिंह कोश्यारी संध्याकाी ५ वाजता शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळाला भेटणार >> शेतकऱ्यांचा मोर्चा राजभवनावर धडकणार. शेतकऱ्यांचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटून निवेदन देणार >> दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा ट्रॅक्टर मोर्चा सुरू. सांगली ते कोल्हापूर निघणार ट्रॅक्टर मोर्चा >> मोर्चाच्या निमित्तानं आझाद मैदाना बुक स्टॉल. कृषी कायदे, संविधान व इतर पुस्तकांची मेजवानी >> राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी होणार >> दादर येथील गुरुद्वाराच्या वतीने अन्न व खाद्य पदार्थाचे वाट >> आझाद मैदानात आंदोलकांसाठी महापालिकेच्या वतीनं वैद्यकीय कक्ष सुरू करण्यात आला आहे. >> शेतकऱ्यांच्या प्रमुख मागण्या: केंद्र सरकारने तिन्ही कृषी कायदे रद्द करावेत, शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळावा, करोना काळात राज्य सरकारनं स्थगित केलेली महात्मा फुले कर्ज माफी योजना पुन्हा सुरू करावी, वनाधिकार खात्याची अंमलबजावणी करण्यात यावी >> राज्यातील विविध शेतकरी संघटनांचा सहभाग. महाविकास आघाडीतील पक्षांचाही मोर्चाला पाठिंबा >> दिल्लीतील शेतकऱ्यांच्या पाठिंब्यासाठी मुंबईतील आझाद मैदानात आंदोलन सुरू