नवी : देशात आज ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा केला जातोय. देशावर करोनाचं संकट असलं तरी देशवासियांत मात्र उत्साह कायम आहे. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्तानं राजपथाहून आज परेड निघणार आहे. दुसरीकडे दिल्ली सीमेवर कृषी कायद्यांचा निषेध करणाऱ्या शेतकरी संघटनांकडून आज ट्रॅक्टर रॅलीही काढण्यात येणार आहेत. याच पार्श्वभूमीवर राजपथावर आणि राष्ट्रीय राजधानीच्या सीमांवर हजारो सशस्र करण्यात आले आहेत. LIVE अपडेटस - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सकाळीच देशवासियांना ७२ व्या प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा सोशल मीडियावरून दिल्या आहेत - झेंडावंदनाचा कार्यक्रम सकाळी ८.०० वाजता होणार आहे. - यानंतर सकाळी ९.०० वाजता परेडला सुरूवात होणार आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर यंदा परेड विजय चौकातून सुरू होऊन नॅशनल स्टेडियमपर्यंत जाणार आहे. दरवर्षी ही परेड राजपथापासून सुरू होऊन लाल किल्ल्यापर्यंत जाते. - सकाळी ११.३० पर्यंत परेड सुरू राहील.