'जैश'कडून एनएसए डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी, सुरक्षेत वाढ - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Saturday, February 13, 2021

'जैश'कडून एनएसए डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी, सुरक्षेत वाढ

https://ift.tt/2ZeYNtC
नवी दिल्ली : यांच्या सुरक्षा व्यवस्थेत वाढ करण्यात आलीय. जैश ए मोहम्मद (JeM) संबंधित अटक करण्यात आलेल्या एका दहशतवाद्यानं पाकिस्तानी हॅन्डलरच्या सांगण्यावरून आपण अजित डोवाल यांच्या कार्यालयाची रेकी केल्याचं कबूल केल्यानंतर हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात येतंय. 'जैश'शी निगडीत याच्याजवळ डोवाल यांच्या कार्यालयाच्या रेकीचा एक व्हिडिओ आढळला होता. काश्मीरच्या शोपियाँचा रहिवासी असलेल्या मलिक याला ६ फेब्रुवारी रोजी अटक करण्यात आली होती. ही रेकी गेल्या वर्षी करण्यात आली होती, असं सांगण्यात येतंय. डोवाल यांच्या कार्यालयाशिवाय श्रीनगरमधील इतरही काही भागांचं मलिककडे सापडलं होतं. हे व्हिडिओ त्याने पाकिस्तानमध्ये धाडले होते, असंही सांगण्यात येतंय यानंतर सुरक्षा एजन्सी अलर्ट झाल्या आहेत. यासंबंधी एक एफआयआरही दाखल करण्यात आली आहे. जम्मूच्या गंग्याल पोलीस स्टेशनमध्ये मलिकविरोधात यूएपीएच्या कलम १८ आणि २० अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मलिक हा जैशच्या '' या ग्रुपचा प्रमुख असल्याचं सांगितलं जातंय. त्याला अनंतनागमधून हत्यारं आणि स्फोटकांसहीत अटक करण्यात आली होती. जमात ए इस्लामी ही संघटना लष्कर ए तोयबा, जैश ए मोहम्मद, हिजबुल मुजाहिद्दीन या इतर दशतवादी संघटनांना आर्थिक मदत उपलब्ध करून देण्याच्या प्रयत्नात आहे, अशी माहिती गुप्तचर यंत्रणांनी गृह मंत्रालयाला दिलीय.