'मोदी-शहा आणि भाजप या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी माफी मागणार?' - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, February 1, 2021

'मोदी-शहा आणि भाजप या राष्ट्रद्रोही कृत्यासाठी माफी मागणार?'

https://ift.tt/2Ml5oQw
कोलकाता : तृणमूल युवा काँग्रेसचे अध्यक्ष यांनी केलल्या दाव्यानुसार, नेत्यांनी हावडामध्ये एका सार्वजनिक रॅलीत राष्ट्रगीत चुकीच्या पद्धतीनं गायलं. यावरून पश्चिम बंगालमध्ये पुन्हा एकदा भाजप आणि तृणमूल काँग्रेसमध्ये वाकयुद्ध रंगलंय. तृणमूल काँग्रेसच्या खासदारांनी सोशल मीडियावर केलेल्या दाव्यानुसार, 'देशभक्ती आणि राष्ट्रवादाचा प्रचार करणारे राष्ट्रगीतही योग्य पद्धतीनं म्हणू शकत नाहीत. हा तोच पक्ष आहे जो भारताच्या सन्मान आणि गौरव कायम राखण्याचा दावा करतो. लज्जास्पद! , , भाजप या 'राष्ट्रद्रोही' कृत्यासाठी माफी मागणार?' असं ट्विट अभिषेक बॅनर्जी यांनी केलंय. तृणमूल काँग्रेसचे महासचिव आणि पश्चिम बंगालचे शिक्षणमंत्री पार्थ चटर्जी यांनीही यांसदर्भात एक ट्विट केलंय. भाजपनं राष्ट्रगीताचा अपमान केला आहे, असं त्यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. भाजपनं आरोप फेटाळले भाजपकडून मात्र आपल्यावर केलेल्या आरोपांचा इन्कार करण्यात आलाय. 'तृणमूल काँग्रेसनं भगवान राम आणि नेताजी सुभाष चंद्र बोस यांच्या मुद्यावर ज्या पद्धतीनं राजकारण केलं त्याच पद्धतीनं ते राष्ट्रगीतावरही राजकारण करत आहेत' असं भाजप नेते शमिक भट्टाचार्य यांनी म्हटलंय.