पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे चक्क 'गाइड'च्या भूमिकेत - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Wednesday, February 10, 2021

पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे चक्क 'गाइड'च्या भूमिकेत

https://ift.tt/2NdWeFq
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मुंबई महापालिकेच्या ऐतिहासिक मुख्यालयात सुरू झालेल्या संकल्पनेत राज्याचे पर्यटनमंत्री यांनीही मंगळवारी मार्गदर्शकाची आगळीवेगळी भूमिका बजावली. ब्रिटनमधील आंतरराष्ट्रीय मंत्री आणि आयुक्तांना मुख्यालयाची सैर घडविताना आदित्य ठाकरे यांनी पुढाकार घेतला. या छोटेखानी दौऱ्यात परदेशी पाहुण्यांनी पालिका मुख्यालयाच्या सौंदर्याचे मनापासून कौतुक केले. वाचा: जगभरात मुंबई महापालिकेची ऐतिहासिक इमारत प्रसिद्ध असून त्यातील वास्तूंसह अनेकविध गोष्टी विस्मयकारक आहेत. त्या पाहण्यासाठी ब्रिटनच्या महिला- समानता मंत्री आणि आंतरराष्ट्रीय व्यापार सचिव यांनी मंगळवारी आल्या होत्या. मुंबईच्या दौऱ्यावर आलेल्या टस आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांसोबत मंगळवार दुपारी ऐतिहासिक पुरातन वारसा असलेल्या मुख्यालयास भेट दिली. त्यावेळी त्यांच्या सोबत आदित्य ठाकरे स्वतः होते. त्यांनी मुख्यालयाच्या प्रवेशद्वाराकडे प्रवेश केल्यापासून ते सभागृहातही गेल्यावर परदेशी पाहुण्यांशी संवाद साधत या ऐतिहासिक वास्तूतील अनेक गोष्टीही त्यांनी उलगडून सांगितल्या. वाचा: तसेच, मुख्यालयाच्या अंतर्गत असलेला सोनेरी घुमटदेखील पाहुण्यांना दाखविण्यात आला. महापौर किशोरी पेडणेकर, स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव, आयुक्त इकबाल सिंह चहल आदी यावेळी उपस्थित होते. तसेच, पुरातन वारसा तज्ज्ञ भरत गोठोस्कर यांनीही ऐतिहासिक माहिती विशद केली. या पाहणी दौऱ्यावेळी ट्रस यांच्यासमवेत ब्रिटनचे दक्षिण आशिया व्यापार आयुक्त- पश्चिम भारतासाठीचे ब्रिटिश उप उच्चायुक्त अॅलन गिमेल उपस्थित होते. वाचा: