करोनाची लस मोफत मिळणार की पैसे मोजावे लागणार? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 11, 2021

करोनाची लस मोफत मिळणार की पैसे मोजावे लागणार?

https://ift.tt/2Z2pVvW
म. टा. विशेष प्रतिनिधी, मुंबई मार्चच्या पहिल्या आठवड्यापासून मुंबईत सर्वांसाठी लसीकरण सुरू होणार असले तरी ही लस मोफत मिळेल, की सशुल्क हे अद्याप पालिका प्रशासनाने स्पष्ट केलेले नाही. सर्वांसाठी लसीकरण सुरू झाल्यानंतर खासगी रुग्णालयांची या प्रक्रियेमध्ये मदत घ्यावी लागण्याची शक्यता आहे. लसीकरणाची प्रक्रिया सशुल्क असेल तर लसीसाठी किती दर आकारायचे यासंदर्भातही संदिग्धता आहे. सार्वजनिक आरोग्य व्यवस्थेचा विचार करता हे लसीकरण सर्वांसाठी मोफत असायला हवे, अशी अपेक्षा राज्य सरकारने व्यक्त केली आहे. पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकणी यांनी, सर्वसामान्यांसाठी मार्चमध्ये लसीकरणाची प्रक्रिया सुरू होईल, असे सांगितले. 'अनेक खासगी रुग्णालयांनी लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये रस दाखवला होता. त्यांच्याकडे लसीकरणाची कोणती सुविधा उपलब्ध आहे, याची विचारणा केली होती. त्यानुसार त्यातील काहींनी प्रतिसाद दिला आहे. त्या माहितीची पडताळणी सुरू आहे. मात्र अद्याप खासगी रुग्णालयांना लसीकरणाच्या प्रक्रियेमध्ये कशाप्रकारे सामावून घ्यायचे यासंदर्भात निर्णय झालेला नाही', असे त्यांनी सांगितले. सर्वसामान्यांसाठी सुविधा उपलब्ध झाल्यानंतर केंद्रांची संख्या वाढवणे, लसीकरणासाठी उपलब्धता तपासून पाहण्यात येणार आहे. कोविन अॅपबाबत अडचणी कोविन अॅपमध्ये अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत. त्याचा परिणाम करोना लढ्यात आघाडीवर असलेल्या कर्मचाऱ्यांच्या लसीकरणावर झाला आहे. पहिला डोस १६ जानेवारी रोजी देण्यात आला होता. दुसरा डोस हा १५ फेब्रुवारी रोजी देण्यात येणार आहे. पहिला डोस दिला, त्यावेळी दुसरा डोस आरक्षित करून ठेवण्यात आला होता. जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. रणजित माणकेश्वर म्हणाले, 'पहिल्या दिवशी ऑफलाइन पद्धतीने झालेल्या नोंदी अद्याप कोविन अॅपमध्ये अपडेट झालेल्या नाहीत. त्यामुळे दुसरा डोस देताना मेसेज पाठवणे, पाठपुरावा करणे यात अडचणी येण्याची शक्यता आहे.' 'त्या' गटांनाच प्राधान्य 'ज्या समूहांना लस देण्याचे ठरले आहे, त्यांनाच प्राधान्य असेल. इतर अनेक जण ओळख, प्राधान्यक्रम, डॉक्टरांचा संदर्भ देऊन लस घेण्यासाठी विचारणा करतात. मात्र, त्यांना लस मिळू शकत नाही, असे पालिकेच्या आरोग्य विभागाने स्पष्ट केले आहे. वयोवृद्ध तसेच गुंतागुंतीचे आजार असलेल्या व्यक्तींना लस दिली व त्यातून काही अडचणी उद्भवल्यास संपूर्ण मोहिमेला खीळ बसेल', असे अतिरिक्त आयुक्तांनी स्पष्ट केले.