शिल्पा शेट्टीच्या मर्सिडीज कारचा Video Viral, किंमत एकदा वाचाच - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Thursday, February 11, 2021

शिल्पा शेट्टीच्या मर्सिडीज कारचा Video Viral, किंमत एकदा वाचाच

https://ift.tt/2Z3x1QH
मुंबई- सध्या तिची लक्झरी कारसाठी (मर्सिडीज बेंझ) चर्चेत आहे. शिल्पाचा या नव्या कारमध्ये बसलेला एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. शिल्पा आणि तिचा नवरा राज कुंद्रा यांनी नुकतीच एक नवीन कार (Mercedes-Benz V-Class)विकत घेतली. या कारसोबतच त्यांच्या लग्झरी कार कलेक्शनमध्ये अजून एका गाडीचा समावेश झाला. या नवीन गाडीसोबत शिल्पाचा एक व्हिडिओ विरल भयानी याने आपल्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. यात शिल्पा आणि राजसोबत शिल्पाची आई आणि तिची बहीण शमिताही दिसते. मर्सिडीज बेंझ व्ही-क्लास कार एक उत्कृष्ट आणि लक्झरी कार म्हणून ओळखली जाते. या कारची एकूण किंमत जवळपास ७१.१० लाख रुपयांपासून सुरू होऊन १.४६ कोटी रुपयांपर्यंत आहे. या कारमध्ये सातजण आरामात बसू शकतात. इंजिन क्षमतेबद्दल बोलायचे झाल्यास ते १९५० सीसी - २१४३ सीसी आहे आणि बाजारात या कारचे पाच वेगवेगळे प्रकार आहेत. प्रत्येक प्रकाराची किंमत वेगळी आहे. शिल्पा शेट्टीच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर शिल्पा लवकरच 'हंगामा २' मध्ये दिसणार आहे. याखेरीज शिल्पाने नुकताच शब्बीर खान दिग्दर्शित ‘निकम्मा’ या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण केलं.