पवारांनंतर गोपीचंद पडळकरांचे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान? - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 7, 2021

पवारांनंतर गोपीचंद पडळकरांचे आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना आव्हान?

https://ift.tt/3v0F7IO
मुंबईः भाजप नेते यांनी जेजुरी गडावर उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण केल्यानंतर आता पडळकरांनी पुन्हा एकदा महाविकास आघाडी सरकारला घेरलं आहे. येत्या १६ मार्चला औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करणार असल्याची माहिती त्यांनी दिली आहे. तर, यावेळी त्यांनी थेट मुख्यमंत्र्यांनाच आव्हान दिल्याची चर्चा आहे. जेजुरी येथे उभारण्यात आलेल्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्याचं नियोजित वेळेच्या आधीच अनावरण करून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर कडवट शब्दांत टीका केली होती. त्यामुळं राज्यातील राजकारण तापलं होतं. पडळकरांनी केलेल्या टीकेवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी जोरदार समाचार घेतला होता. आता पडळकरांनी मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. वाचाः गोपीचंद पडळकर यांनी एक व्हिडिओ ट्वीट करत येत्या १६ मार्चला औंढा नागनाथ येथील अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण मेंढपाळ बांधव आणि भगिनींच्या हस्ते होणार असल्याचं म्हटलं आहे तसंच, कार्यक्रम पत्रिकाही ट्वीट केली आहे. वाचाः मुख्यमंत्र्यांवर निशाणा 'गेल्या वर्षभरापासून मुख्यमंत्र्यांना अहिल्यादेवींच्या पुतळ्याचं अनावरण करण्यासाठी वेळ नाही. माझं कुटंब माझी जबाबदारी यातून मुख्यमंत्र्यांना वेळ नाही. त्यामुळं सर्व समाजाच्या वतीने १६ तारखेला औंढा नागनाथ येथील अहिल्याबाईंच्या पुतळ्याचे अनावरण करणार आहोत.' असंही पळकरांनी म्हटलं आहे.