स्पेशल किड्ससोबत सलमानने केला डान्स, व्हिडीओ पाहून चाहते करतायत कौतुक - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Monday, March 22, 2021

स्पेशल किड्ससोबत सलमानने केला डान्स, व्हिडीओ पाहून चाहते करतायत कौतुक

https://ift.tt/314lNwv
मुंबई: बॉलिवूडचा दबंग अर्थात सलामान खान त्याच्या चित्रपटांसोबतच समाजकार्यासाठीही ओळखला जातो. तो नेहमीच सर्वांसोबत आनंद शेअर करताना दिसतो. सोशल मीडियावर सक्रिय असणाऱ्या सलमाननं त्याच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. ज्याची सोशल मीडियावर जोरदार चर्चा आहे. या व्हिडीओमध्ये तो गतिमंद सोबत डान्स करताना दिसत आहे आणि ती मुलं सुद्धा सलमानला पाहून आनंदी झालेली दिसत आहेत. सलमाननं सोशल मीडियावर नुकताच एक व्हिडीओ शेअर केला. ज्यात तो यांची एनजीओ 'उमंग'मधील स्पेशल किड्ससोबत डान्स करताना दिसत आहे. सलमानसोबत या व्हिडीओमध्ये बीना काक, सोनाक्षी सिन्हा आणि सलमानचा बॉडीगार्ड शेरा सुद्धा दिसत आहे. या व्हिडीओमध्ये सलमान या मुलांसोबत एन्जॉय करताना दिसत आहे. हा व्हिडीओ शेअर करताना सलमाननं लिहिलं, 'उमंग'च्या मुलांसोबत डान्स, देव तुमचं भलं करो, तुम्हा सर्वांना खूप सारं प्रेम' सलमानचा हा व्हिडीओ १५ लाखांपेक्षा जास्त लोकांनी लाइक केला आहे. काही दिवसांपूर्वी बीना काक यांनी इन्स्टाग्रामवर काही फोटो शेअर केले होते. ज्यात , शेरा आणि बीना काक एका ओपन जीपमधून जाताना दिसत आहे. यात शेरा ड्राइव्ह करत असून बीना काक त्याच्या बाजूला आणि सलमान मागच्या सीटवर बसलेला दिसत आहे. सलमानच्या वर्क फ्रंटबद्दल बोलायचं तर तो लवकरच कतरिना कैफ आणि इम्रान हाश्मीसोबत 'टायगर ३'च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. तसेच ईदच्या मुहूर्तावर त्याचा बहुप्रतिक्षित 'राधे: युअर मोस्ट वॉन्टेड भाई' हा चित्रपट सुद्धा रिलीज होत आहे. या व्यतिरिक्त सलमान 'अंतिम' आणि 'कभी ईद कभी दिवाली' या चित्रपटांमध्ये दिसणार आहे.