हृदय पिळवटून टाकणारी घटना, मुलाचा मृतदेह गोणीत टाकून ३ किलोमीटर चालत आणला - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 7, 2021

हृदय पिळवटून टाकणारी घटना, मुलाचा मृतदेह गोणीत टाकून ३ किलोमीटर चालत आणला

https://ift.tt/3eaWpNo
कटिहारः बिहारमधील एक मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. ही घटना बघून तुमच्या अंगावरही शहारे येतील. या घटनेवरून सरकार आणि प्रशासकीय यंत्रणा खरचं गेंड्याच्या कातडीची आहे का? असं प्रश्न उपस्थित होतोय. एका असहाय बापाला आपल्या मुलाचा मृतदेह एका गोणीतून तीन किलोमीटर पायी चालत आणावा लागला. नावेतून पडून बेपत्ता झाला होता मुलगा भागलपूर जिल्ह्यात गोपालपूरमध्ये तीनटंगा गाव आहे. येथे नदी पलिकडे जात असताना १३ वर्षीय मुलगा हरिओम यादव हा नावेतून पडला आणि बेपत्ता झाला. या प्रकरणी गोपालपूर पोलिस ठाण्यात मुलगा बेपत्ता झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली. मुलाचा मृतदेह जवळच्या कटिहार जिल्ह्यातील कुर्सेला येथे नदी किनाऱ्यावर आढळून आल्याची माहिती त्याचे वडील नीरू यादव यांना मिळाली. नीरू यादव हे नदी किनाऱ्यावर गेल्यावर त्यांना मुलाचा मृतदेह दिसला. हा मृतदेह सडला होता आणि जनावारांनीही लचके तोडले होते. पण कपडे आणि शरीरावरील निशाणाच्या आधारावर त्यांनी मुलाला ओळखलं. मुलाचा मृतदेह गोणीत टाकून तीन किलोमीटर पायी चालले मृतदेहाबाबत पोलिसांनी कुठलीही संवेदनशीलता दाखवली नाही. ना कटिहार पोलिस आले ना भागलपूरचे पोलिस आहे. पोलिस आणि प्रशासनाच्या ढिम्मपणामुळे अखेर नीरू यादव यांना आपल्या 'काळजाच्या तुकड्या'चा मृतदेह एका गोणीत टाकावा लागला. एवढचं नाही तर तीन किलोमीटर चालत ते आले. कुठल्या पोलिस ठाण्याने साधी गाडीही दिली नाही आणि सहानुभूतीही दाखवली नाही. किती वेळ प्रशासनाची वाट बघणार. शेवटी मुलाचा मृतदेह असा गोणीत टाकून आणावा लागला, असं नीरू यादव म्हणाले. आता उशिरा जागे झालेल्या प्रशासनाने कारवाई सुरू केली आहे. कुठल्या पोलिसांनी हलगर्जीपणा केला याचा तपास आता कटिहार पोलिस करत आहेत.