रेड्डींच्या बचावासाठी महिला कर्मचाऱ्यांच निवेदन; नवनीत राणांनी केली कानउघडणी - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, March 28, 2021

रेड्डींच्या बचावासाठी महिला कर्मचाऱ्यांच निवेदन; नवनीत राणांनी केली कानउघडणी

https://ift.tt/3rttLtT
अमरावतीः हरिसाल येथील वनपरिक्षेत्र अधिकारी दिपाली चव्हाण यांनी वरिष्ठ अधिकारी विनोद शिवकुमार यांच्या जाचाला कंटाळून स्वतःवर गोळ्या झाडत आत्महत्या केल्यानं राज्यभर खळबळ उडाली आहे. दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी वरिष्ठ अधिकारी यांच्या नावे पत्र लिहलं होतं. या घटनेनंतर शिवकुमार यांना २९ मार्चपर्यंत पोलीस कोठडीचे आदेश दिले आहेत. तर, रेड्डी यांची बदली करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या प्रकरणात खासदार या चांगल्यात संतापल्या असल्याचं दिसत आहे. वनपरिक्षेत्र अधिकारी दीपाली चव्हाण यांच्या सुसाईड नोट मधील मुख्य नाव असलेले श्रीनिवास रेड्डी यांच्या समर्थनार्थ वन विभागातील काही महिला कर्मचारी खासदार नवनीत राणा यांना निवेदन देण्यासाठी गेले होते यावेळी त्यांनी या महिला कर्मचाऱ्यांना खडे बोल सुनावले. मेळघाटातील काही महिला वन कर्मचारी आणि अधिकारी श्रीनिवास रेड्डींच्या समर्थनार्थ खासदार नवनीत राणा यांच्या भेटीसाठी आल्या होत्या. यावेळी राणा यांनी आक्रमक पवित्रा धारण करुन या महिलांना चांगलंच झापलं. महिला असून सुद्धा आपण महिलेची बाजू न घेता, रेड्डी सारख्या अधिकाऱ्यांची बाजू घेत आहात, असं म्हणत संताप व्यक्त केला. तुम्ही सगळे सोबत नाही राहिले तर आणखी दुसरे प्रकरण व्हायला वेळ लागणार नाही, असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे. तसंच, पालकमंत्र्यांचं पत्र असताना चौकशी का नाही केली? त्याचं उत्तर मागा त्यांना, मग त्यांच्या बाजून उभं राहा. मी तुमचं पत्र घेत नाही, असं म्हणत त्यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. दरम्यान, दीपाली चव्हाण यांनी मृत्यूपूर्वी तीन पत्रे लिहिल्याचे समोर आली असून यात त्यांनी आपल्या पतीला लिहिलेले भावनिक पत्र मन हेलावून टाकणारे आहे. पहिले पत्र वरिष्ठ अधिकारी श्रीनिवास रेड्डी यांना, दुसरे पतीला आणि तिसरे आई शंकुतला चव्हाण यांच्या नावे लिहिले आहे. ही तिन्ही पत्रे धारणी पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.