भरणेंनी उजनीचं पाणी इंदापूरला नेल्याचा आरोप; नागरिकांचं तिरडी आंदोलन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Sunday, April 25, 2021

भरणेंनी उजनीचं पाणी इंदापूरला नेल्याचा आरोप; नागरिकांचं तिरडी आंदोलन

https://ift.tt/2PjT7gG
सोलापूर: उजनी धरणातील ५ टीएमसी पाणी इंदापूर तालुक्यासाठी वळते केल्यामुळे सोलापूरचे पालकमंत्री यांच्या विरोधात सोलापूर जिल्ह्यात जनक्षोभ उसळला आहे. त्यामुळं पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा सर्वत्र निषेध होतो आहे. त्याचाच एक भाग म्हणून सोलापूर जिल्ह्यातील महिला अन शेतकरी पुत्रांनी उजनी धरणांत लक्ष्यवेधी तिरडी आंदोलन केले आहे. यावेळी पालकमंत्री भरणे यांचा पुतळा उजनी जलाशयात बुडवून महिलांनी आर्त टाहो करत पालकमंत्र्यांना जलसमाधी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनी सोलापूर जिल्ह्याचा दुष्काळ हटवण्यासाठी उजनी जलाशयाची स्थापना केली. यशवंतरावांच्या आवाहनाला उजनी परिसरातील शेतकऱ्यांनी साथ दिली. उजनीच्या निर्मितीसाठी परिसरातील शेकडो गाव आणि हजारो शेतकऱ्यांच्या जमिनी पाण्याखाली गेल्या. लोकांना स्थलांतरित व्हावे लागले. त्यामुळे उजनी जलाशयाच्या पाण्यावर फक्त सोलापूर जिल्ह्याचा अधिकार असल्याचे त्यावेळी चव्हाण यांनी ठासून सांगितले होते. मात्र आज सोलापूरकरांच्या हक्काच्या पाण्यावर डल्ला मारला जात आहे. एकीकडे जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून घ्यायचे आणि दुसरीकडे जिल्ह्याला 'अनाथ' करायचं असा दुहेरी खेळ पालक मंत्री भरणे यांनी खेळलाय. या धरणातील पाण्यावर होणारे जलसिंचन हे सोलापूर जिल्ह्याच्या अर्थकारणाचा केंद्रबिंदू आहे. पाणीवाटप नियोजनात या धरणात पाणीचं शिल्लक नसल्याचे सांगितले जाते. असे असताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांडपाणी उचलायच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी उचलून इंदापूर तालुक्यातील शेटफळ गढे तलावात टाकायला परवानगी दिली आहे, अशा भावना नागरिक व्यक्त करत आहेत. प्रत्यक्ष परिस्थिती ही दिशाभूल करणारी असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना अंधारात ठेवून पाच टीएमसी पाणी इंदापूरला नेण्यात आले आहे. त्यात पालकमंत्री भरणे यांनी आग्रही भूमिका घेतली अन पाणी नेण्याचा निर्णय ही मंजूर करून घेतला. त्यामुळं सोलापूर जिल्ह्यात अद्यापही अपुऱ्या असणाऱ्या जलसिंचन योजनांवर टांगती तलवार उभी राहिली आहे. त्यामुळं लोकभावना तीव्र झाल्या आहेत. त्यामुळं नागरिक आप-आपल्या परीने निषेध व्यक्त करीत आहेत.