ठाणे: रुग्णवाढीच्या पार्श्वभूमीवर राज्यात संपूर्ण लॉकडाउन (Lockdown in Maharashtra) लावण्याचा इशारा मुख्यमंत्री यांनी दिला आहे. जगभरच्या देशांतील परिस्थितीची माहिती देत मुख्यमंत्र्यांनी हा इशारा दिला आहे. त्याला उत्तर देताना विरोधी पक्षनेते यांनी जगातील देशांनी केलेल्या उपाययोजनांचा पाढा वाचला होता. त्यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते यांनी फडणवीसांना टोला हाणला आहे. () वाचा: लॉकडाउनला विरोध करणाऱ्या राजकीय नेत्यांनी व उद्योगपतींनी मला करोना रोखण्याचा उपाय सुचवावा, असं आव्हान मुख्यमंत्री ठाकरे यांनी दिलं आहे. जगातील अनेक देशांमध्ये पुन्हा लॉकडाउन लागल्याकडंही त्यांनी लक्ष वेधलं आहे. त्याला उत्तर म्हणून काल फडणवीस यांनी भलंमोठं ट्वीट केलं आहे. जगभरातील देशांनी लॉकडाउन लावले असले तरी त्यांनी आपापल्या जनतेसाठी आर्थिक पॅकेज दिली आहेत. 'फ्रान्सने तिसर्यांदा लॉकडाऊन लावला. पण, १२० अब्ज डॉलर्सचे विविध उपाय हाती घेतले. हंगेरीनं युरोपियन युनियनमध्ये भांडून त्यांनी हक्काचा निधी पदरी पाडून घेतला. डेन्मार्कने एप्रिल २०२० मध्येच सर्वच घटकांना पॅकेज दिले. ग्रीसनं २,२०,००० उद्योग आणि ६ लाखांवर कर्मचार्यांना मदत केली. बेरोजगारांना ८०० युरोंपर्यंत मदत दिली. बेल्जियम, पोर्तुगाल, आयर्लंड, फिलिपाईन्स, युके, जर्मनी कुठेही जा, सर्वांनीच काही ना काही दिलंय. त्यामुळं तुलना केवळ परिस्थितीशी नको, सरकारच्या कृतीशीही व्हावी, एवढीच महाराष्ट्राच्या जनतेची अपेक्षा आहे,' असं फडणवीसांनी म्हटलंय. फडणवीसांच्या या ट्वीटला आव्हाड यांनी मोजक्या शब्दांत उत्तर दिलंय. 'फ्रान्स, जर्मनी, युकेच्या नागरिकांना दिली गेलेली मदत ही तिथल्या केंद्र सरकारनं दिली आहे. आपलं केंद्र सरकार काय देणार? अजून राज्याचे हक्काचे पैसे देत नाही. बघा काही मिळते का तुमचे वजन वापरून,' असा खोचक सल्ला आव्हाडांनी फडणवीसांना दिला आहे. वाचा: