जिनेव्हा: जागतिक आरोग्य संघटनेचे प्रमुख टेड्रोस घेब्रेयस यांनी सोमवारी भारतातील करोना परिस्थितीवर ( on India Covid crisis) चिंता व्यक्त केली आहे. करोनामुळे भारतातील परिस्थिती हृदयद्रावक असल्याचे त्यांनी म्हटले. भारतातील करोनाचे संकट दूर करण्यासाठी जागतिक आरोग्य संघटना सर्व मदत करत असल्याचेही त्यांनी म्हटले. भारतात मागील काही दिवसांपासून करोनाबाधितांची संख्या वाढत असून सरासरी तीन लाख बाधित आढळत आहेत. मृतांची संख्या वाढत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. करोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने आरोग्य व्यवस्थेवर ताण आला आहे. टेड्रोस यांनी सांगितले की, जागतिक आरोग्य संघटनेला जेवढे प्रयत्न करता येतील, तेवढे प्रयत्न सुरू आहेत. आवश्यक उपकरणे आणि इतर मदत दिली जात आहे. यामध्ये ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर, प्री फेब्रिकेटेड मोबाइल फिल्ड हॉस्पिटल आणि प्रयोगशाळांचा समावेश आहे. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटनेने पोलिओ आणि टीबीसह इतर आरोग्य विषयक मोहिमांसाठी २६०० तज्ज्ञांचे पथक भारताच्या अधिकाऱ्यांसोबत काम करण्यासाठी पाठवले असल्याचे टेड्रोस यांनी सांगितले. वाचा: मागील नऊ आठवड्यांपासून जागतिक पातळीवर करोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचे त्यांनी सांगितले. मागील वर्षी पहिल्या पाच महिन्यात करोनाबाधितांची जेवढी प्रकरणे आढळली, तेवढीच प्रकरणे मागील आठवड्यात आढळली असल्याचे त्यांनी सांगितले. वाचा: वाचा: अमेरिकेते सर्वाधिक करोनाबाधित आहेत. अमेरिकेत आतापर्यंत करोनाच्या आजाराने पाच लाख ७२ हजारजणांचा मृत्यू झाला असून तीन कोटीहून अधिक बाधित आहेत. त्यानंतर ब्राझील आणि मेक्सिको देशांचा क्रमांक आहे. चौथ्या क्रमांकावर असलेल्या भारतातही करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे.