मुंबई : करोना रुग्णवाढीमुळे अनेक राज्यांत लागू करण्यात आलेला लॉकडाउन आणि त्यामुळे इंधन मागणीत झालेली मोठी घसरण याचा फटका पेट्रोलियम कंपन्यांना बसत आहे. त्यामुळे जागतिक बाजारात ७० डॉलरच्या दिशेनं वाटचाल करत असला तरी कंपन्यांनी पेट्रोल आणि जैसे थेच ठेवले आहेत. आज सलग १६ व्या दिवशी पेट्रोल आणि डिझेलचा भाव स्थिर आहे. आज शनिवारी मुंबईत पेट्रोलचा भाव ९६.८२ रुपयांवर स्थिर आहे. डिझेलचा भाव ८७.८१ रुपये आहे.दिल्लीत आज एक लीटर पेट्रोल ९०.४० रुपये आहे. डिझेलचा भाव ८०.८३ रुपये झाला आहे. चेन्नईत आजचा पेट्रोलचा भाव ९२.४३ रुपये झाला आहे. डिझेलसाठी ८५.७३ रुपये भाव आहे. कोलकात्यात आज पेट्रोलचा भाव ९०.६२ रुपये झाला आहे. डिझेलचा भाव ८३.६१ रुपये आहे. बंगळुरात पेट्रोल ९३.४३ रुपये असून डिझेल ८५.६० रुपये झाला आहे. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये आतापर्यंतचा डिझेलचा सर्वाधिक ८८.९८ रुपयांचा विक्रमी दर आहे. तर पेट्रोल दर ९८.४१ रुपये आहे. सहा दिवसांपूर्वी पेट्रोल १६ पैसे आणि डिझेल १४ पैशांनी स्वस्त झाले होते. एप्रिल महिन्यात क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वाढला अमेरिकी बाजारात शुक्रवारी कच्च्या तेलाच्या भावात किंचित घसरण झाली. ब्रेंट क्रूडचा भाव ६८.३० डॉलर झाला. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमिडिएटमध्ये डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव ६४.७३ डॉलर प्रती बॅरल झाला. एप्रिल महिन्यात ब्रेंट क्रूडच्या भावात ८ टक्के वाढ झाली आहे. तर डब्ल्यूटीआय क्रूडचा भाव १० टक्क्यांनी वधारला आहे.