'आप'चे माजी आमदार जरनैल सिंह यांचं करोनामुळे निधन - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 14, 2021

'आप'चे माजी आमदार जरनैल सिंह यांचं करोनामुळे निधन

https://ift.tt/3bqc5u5
नवी दिल्ली : आम आदमी पक्षाचे माजी आमदार यांचं निधन झालंय. करोना संक्रमणा दरम्यान गुरुवारी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. दिल्लीचे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी जरनैल सिंह यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. 'दिल्लीचे माजी आमदार जरनैल सिंह यांच्या अकाली निधनानं दु:खी आहे. ईश्वर त्यांच्या आत्म्याला शांती देवो. समाजासाठीच्या योगदानासाठी त्यांची नेहमीच आठवण येईल' असं अरविंद केजरीवाल यांनी सोशल मीडियावर म्हटलंय. तर, दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया यांनीही जरनैल सिंह यांच्या आठवणी ताज्या केल्यात. 'दिल्ली विधानसभेतील आमचे माजी सहकारी जरनैल सिंह यांच्या निधनाची बातमी आमच्या सर्वांसाठीच दुखद आहे. १९८४ च्या नरसंहारातील पीडित कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी लढणारा एक बुलंद आवाज आपल्यातून निघून गेलाय. ईश्वर त्यांना आपल्या चरणात जागा देईल', असं सिसोदिया यांनी म्हटलंय. राजकीय कारकीर्द जरनैल सिंह तत्कालीन गृहमंत्री पी चिदंबरम यांच्यावर चप्पल भिरकावल्यानंतर चर्चेत आले होते. त्यानंतर त्यांनी 'आप'च्या तिकीटावर निवडणूक लढली आणि जिकंली. २०१४ साली जरनैल सिंह दिल्लीच्या राजौरी गार्डन मतदारसंघातून आम आदमी पक्षाचे आमदार होते. पंजाब विधानसभा निवडणुकीत आपनं त्यांना आपला चेहरा म्हणून धाडलं आणि त्यांनी विधानसभेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला. पंजाबमध्ये २०१७ च्या विधानसभा निवडणुकीत जरनैल सिंह यांनी पंजाबचे माजी मुख्यमंत्री तसंच सद्य मुख्यमंत्री यांच्याविरोधात लांबी मतदारसंघातून निवडणूक लढली होती. पंजाब विधानसभा निवडणुकीत हरल्यानंतर त्यांची दिल्लीत पंजाब अकादमीचे उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली होती. ऑगस्ट २०२० मध्ये 'आप'नं जरनैल सिंह यांना पक्षातून निलंबित करतानाच तिकीटही नाकारलं होतं. ४७ वर्षीय जरनैल सिंह यांच्यावर गेल्या वर्षी हिंदू देवी-देवतांसंबंधी फेसबुकवर टिप्पणी केल्या प्रकरणी कारवाई करण्यात आली होती.