ताडोबा: एका अधिकाऱ्याचा जीव घेणाऱ्या गजराज हत्तीला पकडण्यात यश - Times of Maharashtra

ठळक बातम्या

Friday, May 7, 2021

ताडोबा: एका अधिकाऱ्याचा जीव घेणाऱ्या गजराज हत्तीला पकडण्यात यश

https://ift.tt/3h7zjbP
मटा वृत्तसेवा । अचानक आक्रमक होऊन दोन अधिकाऱ्यांवर हल्ला करणाऱ्या ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील गजराज हत्तीला पकडण्यात वनविभागाला यश आलं आहे. गजराजला पकडण्यासाठी रात्रभर ऑपरेशन सुरू होते. अखेर पहाटे पाच वाजता त्याला पकडण्यात आलं. ( Caught by Forest Department) ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे मुख्य प्रमोद लेखापाल गौरकार व सहायक वनसंरक्षक रवींद्र कुलकर्णी हे गुरुवारी सायंकाळी बोटेझरी भागात गस्तीसाठी फिरत होते. त्यांचं वाहन चिखलात अडकले होतं. यावेळी अचानक आक्रमक झालेल्या हत्तीनं दोघांवर हल्ला केला. यात प्रमोद गौरकर यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर ताबडतोब घटनास्थळी 'रॅपिड रिस्पॉन्स टीम', पशुवैद्यकीय पथक आणि ताडोबाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. त्यानंतर हत्तीला पकडण्याचे प्रयत्न सुरू झाले. रात्री उशिरापर्यंत हे ऑपरेशन सुरू होतं. पहाटेच्या सुमारास अखेर हत्तीला पकडण्यात आलं. वाचा: हत्ती आक्रमक झाल्यामुळं कोअर भागातील गावकऱ्यांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता, अशी माहिती ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पाचे वन संरक्षक आणि क्षेत्र संचालक डॉ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. वाचा: